Home Uncategorized वैद्य ऋचा देशपांडे : प्रथम पुरस्कार

वैद्य ऋचा देशपांडे : प्रथम पुरस्कार

0

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे आयोजित केलेल्या ‘शॉर्ट व्हिडिओ मेकिंग‘ स्पर्धेमध्ये ‘आयुर्वेद इन माय गार्डन‘ ह्या विभागामध्ये, वैद्य ऋचा हळदवणेकर देशपांडे यांना प्रथम पुरस्कार मिळाला.

आयुष मंत्रालय 2016 पासून दरवर्षी धन्वंतरी जयंती च्या दिवशी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन‘ साजरा करत असते. ह्या वर्षीच्या आयुर्वेद दिनानिमत्त आयुष मंत्रालयाने ‘शॉर्ट व्हिडिओ मेकिंग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतातून शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये वैद्य ऋचा यांना त्यांनी ‘आयुर्वेद इन माय गार्डन‘ ह्या विषयावर तयार केलेल्या व्हिडिओ ला प्रथम पुरस्कार मिळाला.

केंद्रीय राज्यमंत्री आयुष, महिला आणि बाल कल्याण डॉ. श्री. मुंजपरा महेंद्रभाई कालूभाई, केंद्रीय मंत्री श्री.सराबनंद सोनोवाल, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री श्री. अर्जुन मुंडा, केंद्रीय विदेश आणि सांस्कृतिक राज्यमंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान च्या संचालक डॉ. श्रीमती तनुजा नेसरी ह्यांनी हे पुरस्कार नुकतेच नवी दिल्लीत दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी, विज्ञान भवन येथे प्रदान केले. रोख रक्कम रु 75000 आणि विजय चिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वैद्य ऋचा ह्या कोल्हापूरचे नामवंत वैद्य श्री विवेक सुधाकर हळदवणेकर यांच्या कन्या आहेत.

आयुर्वेद इन माय गार्डन‘ हा व्हिडिओ पाहण्यासाठी  वरील लिंक वर क्लिक करा.

नीता देशपांडे

– लेखन : नीता देशपांडे. पुणे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️+919869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version