“मराठी पाऊल पडते पुढे”……या उक्तीप्रमाणे खरोखरच मराठी पाऊल जगाच्या कानाकोपऱ्यात पडताना दिसत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, आनंदाची बाब आहे.
परदेशातील मराठी बंधू, भगिनी मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी, तिचे संवर्धन होण्यासाठी सतत सक्रिय आहेत, हे विशेष होय.
या बंधू भगिनींमध्ये उद्योजक, अभियंते, डॉक्टर, प्राध्यापक विविध व्यावसायिक आहेत. ते सर्व आपापले कामकाज सांभाळून आपल्यातील कलागुण जोपासत आहेत.
यापैकी जे कवी, कवयित्री आहेत त्यांच्यासाठी
जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास समूह, बालरक्षक प्रतिष्ठान आणि आंतरराष्ट्रीय मराठी वेब पोर्टल न्यूजस्टोरीटुडे यांच्या संयुक्तपणें ऑनलाईन जागतिक मराठी कवी संमेलन आयोजित करण्यात येत आहे.
या कवी सम्मेलनात देशाबाहेरील मराठी कवी/ कवयित्री यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ते यशस्वी करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
या संमेलनात सहभागी होऊ इच्छिनाऱ्यांनी कृपया श्री. विलास कुलकर्णी
जागतिक साहित्य कला व्यक्तिविकास मंच, मो.:- +917506848664
किंवा
डॉ. राणी दुष्यंत खेडीकर
अध्यक्षा, बालरक्षक प्रतिष्ठान
मो.:- +919370143014
किंवा
देवेंद्र भुजबळ
संपादक, न्यूजस्टोरीटुडे
www.marathi.newsstorytoday.com
मो.:- +91 9869484800
यांच्याशी कृपया
दिनांक १० सप्टेंबर २०२१ पर्यंत संपर्क साधावा.
संमेलनाची योग्य वेळ व दिनांक नंतर घोषित होईल. ही स्पर्धा नाही, सर्व सहभागी कवी कवयित्री यांना सन्मानपत्र दिले जाईल. कोणत्याही विषयावरील व प्रकारातील कविता चालेल.
कृपया आपल्या ओळखीतील इच्छुक विदेशी मराठी कवी कवयित्री यांनाही या ऑनलाईन कवी संमेलनात सहभागी व्ह्यायला सांगावे, ही विनंती.
आपले स्नेहांकित
विलास कुलकर्णी
डॉ राणी खेडीकर
देवेंद्र भुजबळ