Home साहित्य परात्मा भेटे

परात्मा भेटे

0

आज हनुमान जन्मोत्सव आहे. यानिमित्ताने वाहिलेली ही भावांजली

वायू वेगाने मन धावते
पवनपुत्र हनुमंत होते
सात्विक चैतन्य
त्यात नसते
विकारांच्या विषयात
ते गुंतते ।दु।

हनुमंत उडान करतो गगनाचे
सूर्यास धरण्या
त्याचे जाणे
हे मन स्वयंभू
प्रकाश शोधे
तरी नकळत
षडरिपुत विरघळे ।१।

हनुमंतास मिळे सानिध्य श्रीरामाचे
भावभक्तीचे मंदिर
अंतरी सजले
तसा नाही मनात
देव सामावे
म्हणुनी अहमभावे
असुर डोकावे ।२।

अशा या मनाने
सतकार्य करत जावे
निरंतर लोकहिताचे
धडे गिरवावे
यातुनी लक्ष दीप
तेवतील ज्ञानाचे
जेने करुनी
मनास परात्मा भेटे ।३।

ऍड रुपेश पवार

– रचना : रुपेश पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version