प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या कासार समाजातील बंधू भगिनींच्या यशकथा पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याची मूळ संकल्पना असलेल्या श्री देवेंद्र भुजबळ यांच्या, मुंबईच्या प्रसिद्ध भरारीं प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या “समाजभूषण” या पुस्तकाचे सातारा विभागीय प्रकाशन नुकतेच कालिका देवी मंदिर ,सातारा येथे जेष्ठ करसल्लागार व चित्रपट निर्माते श्री अरुणराव गोडबोले यांच्या शुभहस्ते, आदरणीय श्री हेमंत कासार यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यन्त पवित्र वातावरणात, उत्साहात झाले.
ऍड हेमंत कासार यांनी प्रास्ताविक करून समाजभूषण पुस्तकाचे अनेक खंड निघावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे माननीय अरुणजी गोडबोले यांनी पुस्तकाविषयी सविस्तर विवेचन करून, पुस्तकाचे वैशिष्ट्य व महत्त्व विशद करून भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री भुजबळ आपल्या मनोगतात म्हणाले की तरुणांनी आपल्या आवडीनुसार करिअर निवडावे. पालकांनी देखील मुलांचा कल ओळखून त्यांना मदत करावी. या पुस्तकात आपल्या आवडीनुसार करिअर निवडणाऱ्या व्यक्ती कशा यशस्वी होऊ शकतात, हे दिसून येते. म्हणून बाह्य कारणांनी करिअर न निवडता आपली आवड ओळखा व त्यानुसार करिअर निवडा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
न्यूजस्टोरीटूडे च्या सह संपादक अलका भुजबळ यांनी यावेळी बोलताना सातारा समाजाच्या कार्याचे व सर्वांच्या एकीचे कौतुक करून महिलांनी लिहिते व्हावे असा आग्रह केला.
यावेळी उद्योजक श्री महेश कोकीळ व गुंतवणूक सल्लागार श्री अनिल हेडे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की समाजभूषण पुस्तक तरुण पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे.
पुस्तकाचे लेखक माननीय देवेंद्रजी भुजबळ यांचा परिचय अमर रांगोळे यांनी करून दिला.
यावेळी केरळ मधील सोने चांदी व्यावसायिक, साताऱ्याच्या माहेरवासिण कवयित्री मनिषा पाटील यांनी ही आपलं समयोचित मनोगत व्यक्त केले.
महाकालिका ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ रश्मी हेडे यांनी केले.
सौ ज्योती कासार यांनी आभार मानले.
सौ. जोस्ना खुटाळे, सौ. सविता हेडे, मनिषा हेडे यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. 🙏🏻🙏🏻
अत्यन्त प्रसन्न, पवित्र वातावरणात झालेल्या या कार्यक्रमास समाज बंधू व भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

– लेेेखन : अनिल हेडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देवेन्द्र