हरी विश्व संकुलात काळ्याभोर
मेघांनी पसरवला दाट अंधार
नभांच्या पंचम स्वरात गाजेल
आता विद्युलतेचा दरबार
जल धारां मनसोक्त बरसून
वाजवतील पावसाची धून
तृण पाती न्हाऊन निघतील
प्रसन्नतेने मेघ मल्हार गाऊन
पावसाचे अमृत कण
अंगणात सांडतील झरझर
वृक्षवेलीतून फुटतील मधुर
पाऊसाचे संगीत भरभर
मातीच्या सुगंधित वाऱ्यावर
डोलतील फुलझाडे सारे
पाना पानांवर चमकतील
जलबिंदू जणू नभातील तारे
पावसाचा हा थंड गारवा
तृप्त करेल हरी विश्व सारा
पांडवलेणी तून वाहून निघेल
नवा आनंदाचा झरा
वरुणराजाची कृपा झाली अन्
हरी विश्व सोसायटी आनंदली
पुलकित होऊन आसमंत
पर्जन्य वीणा ही झंकारली

— रचना : ओमप्रकाश शर्मा
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
