Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यपहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन गोव्यात

पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन गोव्यात

पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन कविवर्य बा. भो. बोरकर यांच्या जन्मगावी बोरी- फोंडा, गोवा येथे ५ जून २०२२ रोजी प्रागतिक विचार मंच, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

या संमेलनाच्या अध्यक्ष महाराष्ट्रातील नामवंत कवी फ. मु. शिंदे यांच्या सुविद्य पत्नी, साहित्यिक सौ. लीला शिंदे, औरंगाबाद या आहेत. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री नवदुर्गा संस्थान बोरी फोंडाचे अध्यक्ष श्यामप्रभू देसाई, संमेलनाचे कार्याध्यक्ष सुनील सावकार माजी सरपंच बोरी- फोंडा सह कार्याध्यक्ष जयवंत आडपईकर अध्यक्ष जागतिक विचार मंच पणजी तर संमेलनाचे संयोजक ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश तळवडेकर सहसंयोजक डॉ. अनिता संतोष तिडवे, गोवा या संमेलनाचे निमंत्रक युवा कामगार नेता एडवोकेट अजितसिंह राणे, गोवा.

तसेच विशेष अतिथी म्हणून, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विश्वस्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ, अमरावती. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष तथा अध्यक्ष गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी साहित्यिक रमेश वंसकर. फोंडा सुप्रसिद्ध लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले, फोंडा. पुणे डॉ. श्रीकांत पाटील, फोंडा. अध्यक्ष महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन, कोल्हापूर. ज्योती ठाकरे केंद्रीय अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद तथा सदस्य नियामक मंडळ राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र शासन.

नमिता कीर, सुप्रसिद्ध लेखिका. डॉ.शोभाताई रोकडे, अमरावती. सुप्रसिद्ध लेखक डॉ.तुळशीराम बोबडे. राज देशमुख अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन, अकोला.  प्राचार्य भारती पाटील उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन, नवी दिल्ली. सौ. वृशाली शिंदे ठाणे. अनुराधा नेरूरकर मुंबई. ज्योती ताई कपिले, ठाणे. मा. डॉ. महेश ढगे- पाटील अधिकारी फूड अँड ड्रग्स नागपूर विभाग, नागपूर. संस्थापक अध्यक्ष ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, डॉ. सुनील बेळगावें, पुणे. औरंगाबाद जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बागल. आंतरराष्ट्रीय वेबपोर्टल न्यूज स्टोरी टुडे चे संपादक, लेखक देवेंद्र भुजबळ, नवी मुंबई. मुंबईतील आघाडीचे प्रकाशक अश्विन खरे. इंदोरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते चंद्रशेखर. साहित्यिक विश्वनाथ शिरढोणकर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे संमेलन होत आहे.

या संमेलनाला महाराष्ट्रातून शंभर साहित्यिक, रसिकांची उपस्थिती लाभणार असल्याचे संमेलनाचे मुख्य आयोजक, शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी सांगितले.

पूर्वपीठिका
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे पहिले राज्यस्तरीय शिव बाल किशोर व मराठी साहित्य संमेलनाचे २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुक्ताईनगर, येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. या संमेलनासाठी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील साहित्यिक, रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा