रस्ते, हमरस्ते झाले,
वर्दळ वाढते सारी,
येण्यास मनात उभारी,
शोधावी पाऊलवाट,
गर्दीत हरवती सारे,
कुणी कुणाचे नसे रे,
आपुले हवे, त्यांनी रे,
शोधावी पाऊलवाट,
संसार चालतो न्यारा,
हा जगताचा पसारा,
गोंगाट सोडून सारा,
शोधावी पाऊलवाट,
ह्रदयगुपीत ते उघडावे,
प्रेमाने प्रकटही व्हावे,
निवांत शांत चालावे,
शोधावी पाऊलवाट,
निरखावा तो आसमंत,
शेती, परीसर तो शांत,
नदीचा प्रवाह श्रीमंत,
शोधावी पाऊलवाट,
तो निश्चित हो भेटेल,
दर्शन अवचित घडेल,
जन्मही सफल होईल,
शोधावी पाऊलवाट..!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800