बाळा, तुझा पहिला मऊभाताचा घास
आईच्या ध्यानीमनी फक्त तुझाच ध्यास.
तुझे पहिले अडखळत पडलेले पाऊल
आईच्या मनी किती आनंदाची चाहूल.
तुझे पहिले पहिले बोल बोबडे
आईच्या कानी कोकिळेचे बोल तोकडे.
तुझे ते गिरवलेले पहिले अक्षर
आईच्या नजरेतून नाही हटत त्यातली नजर.
शाळा कॉलेज मधले परीक्षेचे नी गॅदरींग चे दिवस
आणि प्रत्येक वयातले साजरे केलेले वाढदिवस.
लग्नाच्या दिवसांची तुमची खरेदी, नी
पाठवणीच्या वेळी भरलेले डोळे,
पहिल्या वर्षांचे ते सण साजरे, नी
गरोदरपणात ते पहिले डोहाळे.
आता आमचे थोडे अडखळत धडपडणारे पाऊल.
संकेत करती पूर्वसंध्येची चाहूल.
नाही म्हणता, नाही विसरू शकत
आयुष्याच्या सुरेख पाऊलवाटा
सुदंर गहिऱ्या भरतीच्या लाटा
सुदंर गहिऱ्या भरतीच्या ….
त्या पाऊलवाटा
त्या पाऊलवाटा.

रचना : पूर्णिमा शेंडे.