Monday, December 15, 2025
Homeसाहित्यपाऊसधारा

पाऊसधारा

पावसा पावसा गा रे
तुझं गाणं ऐकू येतं रे
गडगडाटात ऐकू येतं रे
विज चमकलीय तरी रे. १

मी कान देऊन ऐकतो
चिंब भिजून ही ऐकतो
पावसा तू गाणं गात रहा
तड तड संगीत साथ पहा. २

आम्ही सगळे ऐकू गाणं
ताल धरुन टिप टिप टिप
वावर शेतात थप थप थप
चिखल तुडवत थप थप. ३

बळे बळे छत्री घेऊन या
पाऊस अंगावर घेऊ या
रिपरिप सुरूच आहे ना
काळाकुट्ट ढग कां जाईना. ४

अंधार वाढतच जातोय
भिती कोण दाखवतोय
थेंब मातीत गंधाळतोय
हा गंध हवेत दरवळतोय. ५

जलद हळू पुढे सरकतोय
मागून दुसरा जागा घेतोय
अविरत पाऊस बरसतोय
जलद समूह दाटी करतोय. ६

राजगायक मल्हार आळवतोय
मेघनेसह मेघ तल्लीन डोलतोय
डेरेदार वृक्ष जलमारा साहतोय
घरटी पक्षी भये काहूर माजतोय. ७

तान घेता कान तृप्त झाले आहेत
वर्षे, चित्तवृत्ती या खुलल्या आहेत
मेघ आकाशी बेभान झाले आहेत
बरस बरसून धारा पुलकित आहेत. ८

नदी नाले ओढे तुडुंब भरले आहेत
निसर्गदूत आनंदे गीत गात आहेत
सढळ हाताने दो कराने देत आहेत
आनंदी आनंद दूर पसरवत आहेत. ९

चंद्रशेखर परांजपे

– रचना : चंद्रशेखर परांजपे. दहिसर, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…
सौ.मृदुला राजे on धुक्याची चादर
सौ.मृदुला राजे on बहिणाबाईं…
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on प्रतिभावान प्रतिभा
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on सानपाडा : अनुकरणीय आनंद मेळावा