श्रावण महिन्यात आपल्याला नैवेद्यासाठी गोड पदार्थ लागतात. तर गोड पदार्थ कोणता बनवू ? असा प्रश्न पडला असेल तर ही आहे खमंग खुसखुशीत “गुळपोळी”.
गुळपोळी बनवायला एकदम सोपी आणि टिकणारी आहे. तर याच्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे….:
बेसन २ वाटी
तूप १ वाटी
गुळ २ वाटी
गव्हाचे पीठ २ वाटी
वेलची पावडर १/२ चमचा
सुंठ पावडर १/२ चमचा
कृती :–
प्रथम गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ व लागेल असं पाणी घालून पीठ मळून घेणे. ही कणिक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळू नये.
सारणासाठी कढईमध्ये थोडं थोडं तूप घालून बेसनाचा रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घेणे बेसन भाजताना गॅस मंद आचेवर असावा जेणेकरून बेसन चांगले भाजले जाईल. हे मिश्रण थोडे गार झाले की त्यामध्ये किसून घेतलेला गुळ, वेलची पावडर व सुंठ पावडर घालून व्यवस्थित मिसळून घेणे (एकजीव करून घेणे) हाताने किंवा मिक्सरच्या साह्याने केले तरी चालेल.
पोळी लाटण्यासाठी कणकीचा एक गोळा घेणे व त्याची खोलगट पारी करून त्यामध्ये सारणाचा गोळा भरून कोरड्या पिठात बुडवून पोळी लाटून घेणे आणि गरम तव्यावर तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घेणे
टीप :-
एवढ्या साहित्यामध्ये साधारणतः १० ते १२ मध्यम आकाराचे पोळ्या तयार होतात
रेसिपी लिंक :-
यू ट्यूब लिंक :
https://youtube.com/@grahrajkitchen873

— लेखन : ममता कुंदप. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800