खेळ चाले पाठशिवणीचा
सुखाचा आणि दुःखाचा
सोबती ते क्षणिक असती
तोल सावरतो मीच माझा
खेळ चाले पाठशिवणीचा
पैशांचा आणि नोकरीचा
मिळाला कितीही तरी कमी
प्रयत्न करतो खूश राहण्याचा
खेळ चाले पाठशिवणीचा
प्रेमाचा आणि दुष्मनीचा
कमी जास्त झाले जरी
कमी करी ताण मी मनीचा
खेळ चाले पाठशिवणीचा
माझ्यातील दोन मनांचा
ऐकतो मी सकारात्मकतेचे
ध्यास सदा जिंकण्याचा

– रचना : सर्जेराव पाटील, ऑस्ट्रेलिया
(कौलवकर नाशिककर )