नां मिळे अन्न
ना घोटभर पाणी
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
घसाही अगदी
सुकून गेलाय
पाऊसही आता
पडे वेळी अवेळी
ऋतुचक्र बदलले
अवनीचीही बेईमानी
नळालाही मिळेना थेंबभर पाणी
असतं तेव्हा
अतिवापर
नसतं तेव्हा
जीवालाही घाबर
मोकळी घागर
मोकळे स्वयंपाकघर
दुष्काळाने माणसाचा जीव बेजार
गाईगुरे लपेटतात उन्हाची चादर
पशुप्राणी फिरतात अनवाणी
नां चारा नां पाणी
देईल का कोणी
हंडाभर पाणी..?
काय तर म्हणे
विहिरीही रुसल्या
नदी आसवांनी। आटल्या
घशाला मिळे
कोरडं पाणी
मासे किनारी चाचपडली
वृक्ष कोलमडली ऑक्सिजनची कमी
गाड्या घोड्यांचे प्रदूषणी वादळ
आजार वाढले
श्वास होलपडले
कित्येक जीव गेले
या पाण्यावाचून..!
पाणीच जीविता
अमृत देव दगडात
माया नाही त्याला
अश्रुंचे आभाळ फुटले
जगात दुष्काळी थैमान
माणूसच याला जबाबदार
हे मानवा थांबव
आता तूझी करणी
निसर्गही देईल
नारळात पाणी

✍️..सौ. विद्या जगताप. जेजुरी, पुणे.
💯💯💯👍👍👌👌👌