Sunday, December 22, 2024
Homeलेखपालकत्व : एक कला

पालकत्व : एक कला

बालकांचे हक्क – भाग : 12

“आमच्या वस्ती मध्ये कोणीही लहान मुलं डॉक्टर, इंजिनियर होऊ असे म्हणत नाही तर गुन्हेगार होऊ असे म्हणतात” असं एक युवती आपल्या वस्ती मधल्या समस्या सांगताना म्हणाली. ते एकून सामाजिक पर्यावरण किती दूषित होत आहे याची प्रखरतेने जाणीव झाली. “आमच्या वस्ती मधील बालके पिण्याचे आणि वापरण्याचे पाणी भरण्यासाठी शाळा मधल्या सुट्टीतच सोडून घरी पळून जातात” असं एक युवक म्हणाला. पाण्याची समस्या बालकांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेत असताना दिसत आहे. (शिक्षण हक्क कायद्याने (RTE) 2009 मध्ये मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले आणि कलम 21-A अंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून त्याची अंमलबजावणी केली.)

बालके ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यांचे मूलभूत हक्क अबाधित राहण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहेतच. तसेच ही जवाबदारी संपूर्ण समाजाचीही आहे. कुटुंब सक्षमीकरण ही संकल्पना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. बालकांना स्वच्छ, निरोगी, शाश्वत पर्यावरण मिळणं हे आवश्यक आहे तसेच स्वच्छ सामाजिक पर्यावरण मिळणं हा त्यांचा अधिकार आहे.

पर्यावरणीय ऱ्हासामुळे जागतिक पातळीवर बालकांचे हक्क धोक्यात येत आहेत. बालहक्क आणि पर्यावरण विषयावरील एका परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या मुलांनी व युवकांनी आपली मते मांडली.
मुलांनी मांडलेल्या समस्या एकून युवा आपल्या समस्या समजून योग्य व्यासपीठावर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत हे दिसून आले. बाल विवाह, बाल मजुरी, कुपोषण, स्थलांतर, शाळाबाह्य मुले, या सर्व समस्या पर्यावरणातील बदलाशी जोडलेल्या आहेत. यामधील परस्परसंबंध समजून घेऊन पर्यावरणाच्या मुद्याला आपल्या कामाचा भाग बनवण्याची गरज असल्याची मते व्यक्त झाली. “आमच्या गावात सांडपाणी, ओला सुका कचरा याचे व्यवस्थापन नीट होत नाही म्हणून लहान मुले खूप आजारी पडतात. आई वडील शेतावर जातात तेंव्हा ते बालकांना पण सोबत घेऊन जातात आणि ही बालके हळूहळू शेतात कामाला लागतात. शाळा शिकत नाहीत. ऊस तोड कामगारांची मुले पण पुढे जाऊन तेच करतात.ते शाळेपर्यंत आणि शाळा त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही”. आपला अनुभव सांगणाऱ्या या युवकाचे वडील ऊसतोड कामगार आहेत आणि हा युवक पण ऊस तोडी करतो. पण त्याने शिक्षण देखील घेतलं आहे. आता तो बी ए करतोय आणि त्याच्या घरातील तो एकमेव युवा आहे जो शिक्षण घेतोय, हे कौतुकास्पद आहे.

शासन आणि स्वयम सेवी संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांनी युवा पिढी घडत आहे तसेच बालकांसाठी देखील काम करत आहेत.बाल पंचायत, युवा गट या माध्यमातून बाल विवाह थांबवण्यासाठी बालके युवा पुढे येत आहेत. या युवकाने आपल्या बहिणी चा बाल विवाह रोखण्यासाठी आपल्या वडिलांची पोलिसात तक्रार केली होती आणि विवाह थांबवला होता.

आमच्या बाल कल्याण समिती पुढे घरून निघून येणारी बालके येतात तेंव्हा ती देखील त्यांच्या राहण्याची जागा, तिथलं असुरक्षित, दूषित वातावरण यामुळे त्रस्त झालेली असतात अशी एक पालक असणारी काळजी व संरक्षणातील बालके जेव्हा बालगृहात दाखल होतात तेंव्हा त्यांचे पुनर्वसन होण्यास योग्य दिशा प्राप्त होते. ही बालके सुरक्षित होतात, त्यांची सुटलेली शाळा परत सुरू होते आणि त्यांचे आनंदी चेहरे समाधान देऊन जातात.

युवक युवतींनी केवळ समस्या मांडल्या नाही तर त्याचे उपाय देखील मांडले आहेत आणि अनेक संस्थांच्या माध्यमातून ही युवा पिढी समाज जागृती चे काम करत आहेत. बालकांना पर्यावरण प्रश्न सहज सोप्या पद्धतीने समजावून गोष्टी रुपात पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम सांगून ही युवा पिढी त्यांना जागृत करत आहेत.
पर्यावरणाचं संतुलन बिघडणं हे बालकांचे हक्क धोक्यात येण्यास कारणीभूत असल्याची पावती मिळत आहे.या प्रश्नाचा गंभीरतेने विचार होणं निश्चितच आवश्यक आहे आणि या दिशेने ठोस पावले उचलली जाणं गरजेचं आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क समितीने तयार केलेल्या जनरल कमेंट २६ मार्गदर्शिकेनुसार केंद्र व राज्य सरकारने संबंधित कायद्यात योग्य बदल करावेत व पर्यावरण रक्षण आणि बालहक्क संरक्षणाकडे अधिक लक्ष पुरवावे, यासाठी पुढील काळामध्ये पाठपुरावा करणे खरंच किती आवश्यक आहे हे युवा वर्गाने सगळ्यांच्या ध्यानात आणून दिलं आहे.
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हो खर आहे मॅडम आपन सर्व जन पर्यावरनाशी जोडले जाने,
    पर्यावरणाची काळजी घेने हे संस्कार पुढील पीढीला देने हे कार्य युवा पिढी व्दारे चांगल्याप्रकारे होवुशकते पन मॅडम प्रकर्षाने जानवनारी एक गोष्ट शेअर करते कुठे ही प्रामानीक पने काम करताना आडवीयेते ती भ्रष्ट सिस्टीम पन त्यातुनही तुमच्या सारखी तळमळीने कार्य करनारे योद्धा आहेत ना म्हणून पुन्हा काम करण्यासाठी प्रेरना मिळते.
    मॅडम तुमच्या कडून हे ऐकून खूप छान वाटले की आपल्या समोर घर सोडून येनारया मुलींना आपल्या कडून योग्य दिशा मिळत आहे त्या भारताचे भविष्य आहेत त्यांना योग्य दिशा मिळने गरजेचे आहे.
    मला आपल्या सोबत पर्यावरना बाबत काम करायला आवडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on अंदमानची सफर : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७
Purnima anand shende on निसर्गोपचार : ३