चिंचवड मोहननगर येथील श्री कालिका देवी मंदिराच्या प्रांगणात २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला, महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा पहिलाच आनंद बझार उपक्रम अत्यन्त यशस्वी झाला. नगरसेविका सौ. मीनलताई यादव यांच्या सहकार्याने या आनंद बझारचं आयोजन करण्यात आले होते.
या बझारचं उद्घाटन दि.२६/१०/२१ नगरसेविका सौ.मीनलताई यादव यांच्या हस्ते व जागतिक उद्योजक श्रीमती प्राची सोरते जगताप, संचालिका, स्कायलार्क ग्लोबल बिझनेस आणि श्री देवेंद्र भुजबळ, निवृत्त माहिती संचालक तथा न्युज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलचे संपादक, प्रमुख पाहूणे यांच्या उपस्थितीत पार पडला. दुग्ध शर्करा योग म्हणजे यावेळी श्री. देवेंद्र भुजबळ यांच्या “समाजभुषण” पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या शुभहस्ते जल्लोषात करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री भुजबळ म्हणाले की, सर्व समाजाने या उपक्रमाची दाखल घेत आपल्या परिसरातील महिलांना देखील प्रोत्साहन, उद्योग व्यवसायात प्रेरणा मिळावी आणि त्या स्वकर्तृत्वावर उभ्या राहाव्यात या साठी प्रयत्न केले पाहिजेत या साठी असे अधिकाधिक उपक्रम राबवावेत.
सो.क्ष कासार समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री कृष्णकांत सासवडे यांनी सर्वाचे स्वागत केले. मंडळाचे सहसचिव श्री सुदाम डंबाळे यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
महिला अध्यक्ष सौ.वैशालीताई होरणे यांनी आभार मानले. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत आपल्या महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले. मान्यवरांनी आपले समयोचित मनोगत व्यक्त केले.
यावेळी सौ.शोभाताई शेटे आणि मान्यवरांनी सो. क्ष. कासार समाज महिला मंडळ पिंपरी चिंचवड यांच्या दिवाळी महोत्सवाचे कौतुक केले व सर्व स्टॉलला भेट दिली.
यावेळी नगरसेविका सौ.मिनलताई यादव, सो.क्ष. कासार महिला मंडळ, पिंपरी चिंचवड अध्यक्ष सौ. वैशाली होरणे, सौ.शोभाताई शेटे, सौ.रुपाली कासार, उपाध्यक्षा सौ.अंजली सोळंकर, सेक्रेटरी सौ.अंजली झरकर, कार्याध्यक्षा सौ.गिता अचलारे, सहकार्याध्यक्षा सौ.मिरा तंटक, सौ.शितल कोळपकर, सौ.आरती चांदोडकर सौ.डोरले ई कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
विद्यमान नगरसेविका मीनलताई यादव आणि मा. विशालशेठ यादव यांचे पहिल्या दिवसापासून मोलाचे योगदान लाभले.
सो.क्ष.कासार समाज सेवा मंडळाचे सर्वश्री देवेंद्र झरकर, सुनील पाटील, पवन कोकिळ, सुदाम डंबाळे, आनंद अचलारे, प्रदीप शेटे इ. कार्यकारिणीतील पदाधिकारी व शामराव शेटे, गोविंदराव कंदलकर इ. सल्लागार तसेच महेश कोळपकर, शैलेंद्र शेटे, संदीप तंटक, गोपाळ चांदोडकर, विनोद डोरले इ. कार्यकर्ते आणि समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेवटी मान्यवरांच्या शुभहस्ते देवीची आरती करुन, प्रसादाचा लाभ घेऊन आणि चहापानानंतर या अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली.
या आनंद बझारमध्ये सहभागी झालेल्या स्टॉल धारकांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मोठी मदत झाली, हे या आनंद बझारचे मोठेच यश होय.
– टीम एनएसटी 9869484800