पिकनिकला जायचं या कल्पनेने मन एकदम उल्हासित होत. त्या दिवसाची वाट बघता बघता तो दिवस कधी येऊन ठेपतो हे कळतच नाही. तो दिवस येई पर्यंत पिकनिक साठी काय काय सोबत घ्यायच, याची तयारी चालू होते. ठेवणीतल्या वस्तू, कपडे, गॉगल, हॅट्स अशा पिकनिक साठी लागणाऱ्या सामानाची जमवाजमव सुरू होते. एकमेकींना फोन करून आठवण केली जाते.
काय मैत्रिणींनो खरं की नाही ? तर असच काहीस झालं आमचं. आमच्या सोसायटी ची पिकनिक ठरली आणि झाली सुद्धा. अगदी अचानक ३/४ मैत्रिणींच्या मनात आल की, सोसायटी मधील महिलांना एकत्र करायचं तर जवळपास कुठेतरी पिकनिक काढू. सगळ्यांना एकत्र मजेत एक दिवस घालवता येईल आणि एकमेकींची ओळख होईल. आमची सोसायटी म्हणजे, १२ टॉवर्स एक मोठी कॉलनीच, आणि त्यातील ३ टॉवर्स म्हणजे आमची एक सोसायटी. दिवस ठरला, w’app ग्रुप तयार झाला. त्याच नाव दिलं मिलेनियम क्वीन्स. त्यातील ३० जणी पिकनिक साठी ठरलेल्या दिवशी येण्यास तयार झाल्या. ग्रुपवर पिकनिक लिस्ट तयार केली.
माहिती, सूचना, फोनाफोनी करून आम्ही सगळ्या अगदी ठरल्या प्रमाणे सकाळी ०७३० वा सोसायटी ऑफिस जवळ जमलो.
खंरतर इतर वेळेस मुलांची शाळेची तयारी, ‘ह्यांचा’ डबा यातच सकाळच्या वेळेची एव्हढी धावपळ असते की कसा वेळ जातो ते लक्षात येत नाही पण तरीही पिकनिक म्हणून सगळ्या, घरची ही काम ऍडजस्ट करून पाठीवर सॅक, मोठ्या बॅग घेऊन वेळेवर हजर झाल्या. पण बसचा अजून पत्ता नव्हता, पण नाराज न होता ग्रुप फोटो काढत बसची वाट पाहिली. बस येताच जो काही जल्लोष होत होता, त्याच वेळेस पिकनिक मस्तच होणार याची ग्वाही मिळाली.
बस मध्ये चढताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो काही उत्साह ओसंडून वहात होता त्यावेळेस असं वाटल, ह्याच महिला इतर वेळेत घर, ऑफिस, पाव्हणे मंडळीच करत, एकेक आघड्या पार पाडत आज स्वतः साठी वेळ काढून उत्साहाच टॉनिक घेऊन परत एकदा नविन आघाडी सांभाळायला तयार. अंताक्षरी, जोक्स, धमाल, मस्ती करत आम्ही पिकनिक स्पॉट ला पोहोचलो.
प्रथम चहा नाश्ता घेताना हिच चर्चा, असं आयत खायला मिळालं आणि कुठलीही घाई घाई न करता खातोय याची मजा काही औरच. सर्वांनी मनसोक्त चहा नाश्ता एन्जॉय केला आणि आपापल समान लॉकर मध्ये ठेऊन प्रसन्न मुद्रेने फिरायला निघाल्या. ग्रुप ग्रुप ने फोटो काढले जात होते.
सर्वांनी स्विमिंग आणि वॉटर गेम्स एन्जॉय करायचं ठरलं. त्या प्रमाणे कपडे बदलले. पाण्यात जाताना आय ऊई करत किती थंड आहे पाणी म्हणत, दोन मिनिटांनी, किती मज्जा येतेय, पाणी काहीच थंड नाही असं म्हणतं पाण्यात डुबकी मारत मस्ती करत, एकमेकींचा हात धरत पाण्यातून पुढे पुढे जात शॉवर खाली, पाण्यातील वॉटर गेम्स ची मज्जा घेत पाण्या बरोबर एकरूप झाल्या.
आमच्या ग्रुप मधील आमची एक सखी पाण्यात उतरली नव्हती त्यामुळे तिने सर्वांचे फोटो काढले तर आमच्या ग्रुप मधील सर्वात वयाने मोठ्या असलेल्या फक्त ७७ वर्षाच्या आजी, पाण्यात पाय टाकून बसल्या तर थोड्या वेळानी स्विमिंग च्या कट्टयावर, एक हात डोक्याखाली धरून आडव्या झाल्या आणि हिरोईन सारखी पोज देऊन फोटो काढायला सांगत होत्या तेव्हा वय फक्त म्हणायला असत याची प्रचिती आली.
पाण्यात शरीर एकदम हलक होत त्यामुळे सगळ्याजणी जणु पाण्यावर तरंगतायेत असा भास होत होता. पाण्यातील घसरगुंडी खेळताना घाबरत घाबरत उतरताना हसून हसून पुरेवाट. तर काही जणी अगदी बिनधास्त घसरून पाण्यात पडत होत्या. त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटतं होत. ‘रींगा रिंगा रोझी’ सारख्या कविता म्हणत, गोल रिंगण करून पाण्यात डुबकी मारताना खुपचं मज्जा आली. प्रत्येक पोज मधील फोटो काढायला सांगत होत्या तर, जी सगळ्यांचे फोटो काढत होती ती सुद्धा न राहून पाण्यात उतरली आणि मग काय मज्जाच मज्जा. नुसता हास्य कल्लोळ उसळला होता.
नंतर सर्वांनी रेन डान्स ची मजा घेतली. त्या पाण्याच्या फवाऱ्यात गाण्याच्या तालावर मनसोक्त नाचून घेतल. ह्या सगळ्यात दोन तास कधी गेले हे समजलेच नाही. अगदी बळबळेच पाण्यातून बाहेर पडलो. शॉवर घेऊन आम्ही जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला तर एकीची एसस्क्रिम ची डिमांड. मग काय विचारता सर्वांनी एसस्क्रिमचा आनंद लुटता.
नंतर सर्वांनी या निमित्ताने एकमेकांचा परिचय करून घेतला. नावं, आवड, वयक्तिक माहिती, व्यवसाय जाणून घेताना घर सांभाळून स्वतःची आवड कशी जोपासली आणि त्यातून स्वतःची प्रगती कशी केली याची माहिती मिळाली. प्रत्येकीचा वेगवेगळा अनुभव ऐकताना प्रत्येकीच कौतुक वाटतं होत.
मग दमशेरा खेळताना, एकेकिच्या कलेचं कसब पणाला लागत होत. तर, नावं ओळखतांना हसून हसून पुरेवाट. संगीत खुर्ची खेळताना पळत पळत खुर्ची मिळवताना नशिबाने साथ दिली तर खुर्ची मिळते याची प्रचिती येते. हे गेम खेळून झाल्यावर सगळ्यांना आता घराची ओढ लागली होती. चहा आणि परत एकदा थोडा नाष्टा करून संपूर्ण ग्रुपचा वेगवेगळ्या जागेवर फोटो काढला. W’app ग्रुपचा प्रोफाइल फोटो हा पिकनिक ग्रुप्र फोटो ठेवायचा असे ठरले.
आणि ज्या वेळेस बस सोसायटी मध्ये आली उतरल्यावर सगळ्यांनी *हिप्पेप हुऱ्ये* चा जल्लोषात नारा देत पुन्हा लवकरच भेटू असे आश्वासन देत बाय बाय करत एकमेकींचा निरोप घेतला.
तर अशी ही मिलेनियम च्या क्वीन्स च्या पिकनिक ची कहाणी. कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
– लेखन : अलका भुजबळ. 9869484800
उत्साहपूर्ण पिकनिकचे छान वर्णन.
अलका तुझे कौतुक करावे तितके कमीच आहे. सगळ्यांना एकत्रीत करून छान पिकनिक आरेंग करणे हा गुण तुझ्या रक्तातच आहे. तुमची पिकनिक पाहून आपल्या जुन्या म्हणजे व्हॉलीबॉल च्या दिवसांची आठवण जागी झाली.त्यात तुझ्या मिस्तरांची साथ..धन्य आहे.. आजच्या तुमच्या पिकनिक बद्दल खूप छान लिहीले आहे, असे वाटले की मी ही सोबत आहे आणि एन्जॉय करतेय. Salut तुला….
धन्यवाद प्रीती. खरंच आपले v.ball चे दिवस काय मस्त होते. प्रत्येक टूर आपण एन्जॉय केली. 🤽🤝🤝 Tq प्रीती
मिलेनियम पिकनिक मस्तच होती.असे मधून मधून outing हवे असते गृहिणींना..त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर येतात.
अलका भुजबळ यांनी हे article फारच छान रंगविले आहे.आपण प्रत्यक्ष पिकनिक अनुभवत आहोत असेच वाटते.फोटो तर फारच छान आहेत.आपलाही दिवस रंगीत होऊन जातो.
मेघना साने
पिकनिकचे मॅनेजिंग खूप छान केलेस अलका !
वर्णनलेखही सुंदर !
फोटो व्हीडिओ अप्रतिम !
तुम हो तो सारा सही !
Tq वर्षा खुप मज्जा आली पिकनिक ला.
अलका, किती मस्त लिहिलय वाचता वाचता मी पण
तुमची पिकनिक एन्जॉय करतेय असे वाटत होते
अगदी सुरवाती पासूनच गाण्याच्या भेंड्या, मजा, धमाल पोहणे, सेल्फी, झोपाळ्यावर खेळणे, संगीत खुर्ची,दमशेरा,
पाण्यातील रेन डान्स अहाहा एकदम धमाल केली तुम्ही सर्वानी. एक टाॅनिक एक एनर्जी सर्वाच्या चेहर्यावर झळकत होती अलका, तू मस्तच वर्णन केल्याबद्दल हॅट्स ऑफ. ग्रेट….
धन्यवाद पूर्णिमा, अजूनही पिकनिक चा हँगओव्हर उतरला नाही.💃🥳
Picnic ch khoop Chan varnan kela ahe…. Alka ekdam sahi
Tq गीता