आत्तापर्यंत ६ राज्यस्तरिय पुरस्कार प्राप्त साहित्यिक बाळासाहेब लबडे यांच्या प्रसिद्ध “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीवरील परिसंवादाचे आयोजन “मुक्तसृजन” साहित्यपत्रिका औरंगाबाद यांच्यावतीने ऑनलाइन पद्धतीने नुकतेच करण्यात आले.
या परिसंवादाचा विषय “पिपिलिका मुक्तिधाम : आकलनाच्या नव्या दिशा” असा होता. डाँ आनंद पाटील, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यासक व तुलनाकार, माजी इंग्रजी विभाग प्रमुख, गोवा विद्यापीठ हे या परिसंवादाचे अध्यक्ष हे होते. वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डाँ संजय बोरूडे अहमदनगर, लेखिका अभ्यासक कवयित्रि प्रा सुजाता राऊत, ठाणे या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्त सृजन पत्रिकेच्या सहसंपादक प्रिया धारूरकर यांनी केले तर स्वागत संपादक कवी समीक्षक डाँ महेश खरात यांनी केले. त्यानंतर वक्त्यांनी आपले “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीवरील शोधनिबंध वाचले.
“पिपिलिका मुक्तिधाम” ही ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केलेली २०१९ मधील बहुचर्चित कादंबरी आहे. महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांनी तिची समीक्षा करूनही अजुनही नव्या नव्या पद्धतीने समीक्षा होत आहे. मी माझ्या पद्धतीने या कादंबरीची मांडणी करणार असुन खरेच ही कादंबरी मराठी कादंबरीतील परीवर्तनाच्या टप्प्यावरील कादंबरी आहे या डाँ नागनाथ कोत्तापल्ले यांच्या विधानाशी सहमत आहे. अशी सुरूवात
“उत्तर आधुनिकता आणि पिपिलिका मुक्तिधाम ” या विषयाअंतर्गत डॉ.संजय बोरुडे यांनी केली.
ते म्हणाले “उत्तर आधुनिकतेचे निकष लावून या कादंबरीची समीक्षा व्हायला हवी. या निकषांवर मराठीत उतरणारी ही पहिली कादंबरी आहे”
पिपिलिका कांदबरी संदर्भात अनेक लेखकांनी समिक्षा केलेली असून अनेक लेखकांनी या कांदबरीच्या आशयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असतांना सगळ्यामध्ये एक वाक्यता दिसून येते की, ही कांदबरी वाटते तितकी सोपी नाही, म्हणजे ती आकलनाच्या दृष्टीने पचायला अवघड आहे. त्याचे मुख्य कारण असे की या कादंबरीसाठी त्यांनी जो गाभा निवडलेला आहे तो वेगळ्या पध्दतीचा आहे. कांदबरीतील निवेदिका म्हणून ज्या चार मुंग्या आपल्याला दिसतात या चार मुंग्यांच्या माध्यमातून त्यांनी समकालीन वास्तव, धर्म, वंश, परंपरा, आधुनिकता, नवगता आधी सर्व घटनांचा, सर्व घटकांचा एक वेगळ्या पध्दतीने, एक त-हेवाईक पध्दतीने परंतु तो तात्विक अन्वय मांडलेला आहे. अशा पध्दतीला अन्वय वाचण्याचा किंवा पाहण्याचा आपल्याला सवय नसते, त्यामुळे ही कांदबरी थोडीशी अवघड वाटू शकते. आणि घाईघाईने यावर भाष्य करायला बरेच लेखक धजावत नाही. कोणी त्याच्या रचनेच्या अंगाने, किंबहुना स्वरुपाच्या अंगाने, शब्दकलेच्या अंगाने, प्रतिभेच्या अंगाने, प्रतिकेच्या अंगाने बोलतात. मात्र या कांदबरीचा गाभा तरी सुध्दा कोणाला सापडला यावरील समर्पक लेख माझ्या वाचण्यात नाही.
आजचा मुद्दा आहे की उत्तर आधुनिकता आणि पिपिलिका मुक्तिधाम या अंगाने मी काही मुद्दे समोर ठेवत आहे. तर उत्तर आधुनिकता म्हणजे काय ? या अगोदर आपणांस आधुनिकता माहित असणे गरजेचे आहे. आता उत्तर आधुनिकता हे पर्व सुरु होऊन जवळपास पन्नास वर्षाहूनही जास्त काळ लोटलेला आहे. उत्तर आधुनिकतेचे अस्तित्व आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जाणवते. तरीही उत्तर आधुनिकता म्हणजे नेमके काय ? याची व्याख्या करणे अवघड जाते आहे. सुरुवातीला काही तात्विक भागावर प्रकाश टाकू नंतर या कांदबरीच्या अनुषगाने काही उदाहरणांवर प्रकाश त्यांनी टाकला. आधुनिकता ह्या वाङ्ममयीन घटकांवर आपण जी काही चर्चा करत असतो ती ब-याचदा सवंगपणे किंवा ढोबळपणे आपण बोलत असतो. उत्तर आधुनिकतेच्या परंपरेचा त्यांनी धांडोळा घेतला.
प्रा सुजाता राऊत म्हणाल्या की, पिपिलिका ही वाचकांना एक आव्हान आहे, ती रूढ चाकोरीतील कादंबर्यांप्रमाणे नाही, ती मुंग्यांच्या रूपकातून व्यक्त होते. तिच्या अनेकविध भाषा आहेत. संवाद वेगळे आहेत. तत्वज्ञान व्यापक आहे. ती अखिल भारतीय पातळीवर जाते. तिचे अर्थ अनेक निघतात. तिच्यात काव्यात्मकता आहे. अनेक कादंबर्यांची तुलना करून त्यांनी या कादंबरीचे वेगळेपण स्पष्ट केले.
डाँ आनंद पाटील यांनी आपला अध्यक्षिय शोधनिबंध वाचला. यात त्यांनी अतिशय अभ्यासपुर्ण जागतिक पातळीवरील अभ्यासकांची मते मांडत कलाकृतींचे विश्लेषण केले. पिपिलिका मुक्तिधाम सारखी कादंबरी मराठीत दुसरी नाही. मर्ढेकरांचे सौदर्यशास्त्र हे उसने आहे. ते इथे लागू पडत नाही. या कादंबरीचे मूल्यमापन स्वतंत्र निकषांनी उत्तर आधुनिक विचारवंत देरीदा, नित्शे, फुको, काम्यु यांच्या विचारधारेने करावे लागेल. त्या निकषांविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. “या कलाकृतीत वेगळा रांधा आहे. ही कलाकृती म्हणजे ऐतिहासिक आंतरसांस्कृतिक भाषिक क्रिएटीव्ह संहिता आहे. ही कादंबरी म्हणजे मराठीतील पहिली उत्तर आधुनिक कादंबरी आहे. लेखकाने अनेक विचारधारांची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्, चिकित्सा केली आहे तीही संयमाने. त्यामुळे ती वाचकांना भावते.
पत्रिकेचे सहसंपादक डाँ रामकृष्ण दहिफळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पत्रिकेचे सहसंपादक डॉ संतोष देशमुख यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
– टीम एनएसटी 9869484800.
