Thursday, September 18, 2025
Homeसंस्कृतीपुजन महापुरुषांचे

पुजन महापुरुषांचे

आज अमावस्या दीपपूजा आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख..

दिवा हा ज्ञानाचा प्रतिक आहे. “तमसो मा ज्योतिर्गमय” ह्या मंत्रोच्चाराने जीवनपथ प्रकाशित होत असतो. Lead me from darkness to light असं एक इंग्रजी वचन आहे. याचा अर्थच असा आहे की, मला अंध:काराकडून प्रकाशाकडे न्यावे. आपल्या जीवनात खरा प्रकाश हवा असेल तर त्याची ज्योत ही प्रथम हृदयात लागणे आवश्यक असते . कारण….

शुभं करोतु कल्याणमारोग्यमं धनसंपदा: ।
शत्रुबुद्धी विनाशाय दिपज्योतिर्नमोस्तुते ।।

दिपज्योति परब्रह्म दिपज्योतिजनार्दन: ।
दिपो हरतु मे पापं दिपज्योतिर्नमोस्तु ते ।।

दिपज्योत ही शुभ करणारी, कल्याणकारी, आरोग्यदायी व धनसंपदा देणारी व शत्रूबुद्धीचा विनाश करणारी असते, आणि म्हणूनच तिला नमस्कार करुन तिचे पूजन करणे हे संस्कारशास्त्र आहे. शत्रूबुद्धी विनाशासाठी तशी भावना प्रथम हृदयात जागृत व्हावी लागते, आणि म्हणूनच दिप प्रकाश हा हृदयात प्रकाशला तरच जीवनात त्याचा उजेड हा सर्वांना मार्गस्थ होईल.

हृदयात दिपज्योत प्रकाशण्यासाठी जीवनात असणारे काम, क्रोध, मत्सर, लोभ, मोह आणि मद हे षड्रिपू दूरस्थ होण्यासाठी त्यांना प्रकाशमार्ग दाखविणे आवश्यक असते. त्यामुळे हे रिपू नाश पावतात. जिथे पाप घडते, तिथे अज्ञान असते, आणि अज्ञानाच्या अंध:काराला दूर करण्यासाठी प्रकाशदायी दिप आवश्यक असतो.
अशा प्रकाशदायी दिपाला नमस्कार करणं हा जीवन संस्कृतीचा पाया असतो, आणि ह्या पायावरच जीवनाची इमारत उभी असते.

ह्या दिपाचे पूजन करण्यामागे आणखीन एक प्रेरणाशास्त्र आहे. दिप स्वतः जळतो, आणि दुसऱ्याला प्रकाशमार्गी करतो. अज्ञान दुरत्वासाठी दैवी विचारांचा प्रकाश पसरण्यासाठी अखंड जळत रहाणे, ही जीवनदीक्षा दिप आपणास देत असतो.
जो दिवा अंधारात धडपड्यापासून वाचवीत असतो, तो त्याच्या प्रकाशाने जीवन रस्ता दाखवितो, आणि म्हणूनच त्याला नमस्कार करणं हा संस्कारी जीवनाचा पाया ठरतो.
उपनिषद् आपणास सांगते ….

असतो मा सत् गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मामृत गमय

मानवी जीवन प्रवास हा असत्कडून सत् कडे, अंधारातून प्रकाशाकडे, आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे झाला पाहिजे, यासाठी जीवन मार्गावर प्रकाशदायी असणारे महापुरुष मार्गदर्शक असतात.
अशा महापुरुषांचे पूजन हे दिपपूजनच असते.म्हणून प्रेममय प्रकाशात शांतीच्या मार्गाने जीवन मार्ग दाखविणाऱ्या दिपांचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.
।। हरि ओम् तत्सद ।।

अरुण पुराणिक

– लेखन : अरुण पुराणिक. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा