मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व डी एम एस फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित कवी संमेलन भाविसा भवन, पुणे. ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी वि.ग.सातपुते सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या प्रसंगी संस्थेचे श्री विनायक माने, प्रा.डॉ. ठाकुरदास, ऍड. संध्या गोळे, डॉ. शिवणेकर उपस्थित होते. एकुण 30 कवीनी आपल्या कविता सादर केल्या.
‘जाणीव’ या विषयावर सामाजिक, प्रेम, निसर्ग, मानवी संबध अशा अनेक विषयाना हात घालणाऱ्या कविता सादर करण्यात आल्या.
सहभागी मान्यवर कवी कवयित्री भाग्यश्री खुटाळे, यशवंत देव, मकरंद घाणेकर, सौ. अश्विनी अशोक पिंगळे, केतकी देशपांडे, प्रणव तडवळकर, शैलजा साने,अपर्णा चितानंद, डॉ.मृदुला कुलकर्णी (खैरनार) शुभदा कोकीळ, चंद्रशेखर कासार, श्रीमती सुषमा हिरेकेरूर, सौ.राधिका दाते, अरुण तुळजापूरकर, उज्वला कोंडे, सुरेश शेठ, राहुल भोसले, त्र्यंबक बोरीकर ॲड कु .अंकिता होरणे, स्मिता धारूरकर, स्मिता कंदले रासने, बाबा ठाकूर, दत्तात्रय खंडाळे, वसंत बिवरे, दिपाराणी गोसावी, सुधाकर धोपटे, संध्या गोळे, शिवणेकर या मान्यवरांनी कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचा समारोप करताना संमेलनाध्यक्ष वि.ग. सातपुते यांनी काव्य या विषयावर आपले भाष्य करून जाणीव नेणीव ही विषयानुरूप कविता सादर केली.
प्रा. डॉ. महेंद्र ठाकूरदास यांनी सर्वांचे स्वागत केलं तर विनायक माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन श्रीम. स्मिता धारूरकर, तर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ.मृदुला कुलकर्णी-खैरणार यांनी केले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800