पुणे येईल बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात नरवीर तानाजी मालुसरेंच्या सिंहगडावरील शौर्यगाथेवर आधारित ६० फ्लेक्सचे भव्य प्रदर्शन ४ आणि ५ जानेवारी २०२५ या दिवशी मिलिटरी कमांडरांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
इतिहास तज्ज्ञ, गड आणि किल्ले संवर्धन प्रेमी, राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाला मिळालेल्या ४०० जणांच्या प्रतिसादाबद्दल विंग कमांडर शशिकांत ओक यांनी समाधान व्यक्त केले.
लष्करी बाजूने विचार करायला लावणारी प्रदर्शने शाळा, कॉलेज मधे दाखवणे नितांत आवश्यक आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. यासाठी दोन शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला आहे. पालक आपल्या मुलांना स्लाईड्स समजावून सांगताना पाहून ओक यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी ॲडमिरल नाडकर्णी, एअर मार्शल प्रदीप बापट, मेजर जनरल शिशिर महाजन, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, प्रा. नामदेवराव जाधव यांच्या सह अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800