Home बातम्या पुणे : ‘हिम्मत का तराना’

पुणे : ‘हिम्मत का तराना’

0

पुणे येथील गुरुकृपा संस्थेने सिप्ला फाउंडेशनच्या कॅन्सरग्रस्तांसाठीच्या पॅलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये  ‘हिम्मत का तराना’ हा गाण्यांतून सकारात्मकता जागवणारा कार्यक्रम नुकताच सादर केला.

या कार्यक्रमात संजय मरळ, रुचिरा गुरव, रश्मी वसगडेकर, सुनील कुलकर्णी यांनी वैविध्यपूर्ण गाणी गाऊन रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनावरील भार कमी करण्याचा प्रयत्न केला.

‘ओ मेरी जोहराजबी’ हे गाणं ऐकताना पेशंटच्या नातेवाईकांनी देहभान विसरून नृत्य केले. संजय मरळ यांनी केलेल्या मिमिक्रीमुळे प्रेक्षक मनमुराद हसले. पेशंट्स आणि स्टाफ यांनी वेळोवेळी मनापासून दाद दिली, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाची पावती दिली.

श्रुती कुलकर्णी, वंदना खोडे, अशोक पडोळकर, संजय पांडे आणि सुनील कुलकर्णी यांनी उत्तम नियोजन केले.

सुजाता चौहान व गुरुकृपा संस्थेचे पुणे कार्यवाह प्रशांत थोरात यांनी सूत्रसंचालन केले.

गुरुकृपा संस्थेचे अध्यक्ष पंकजनाथ महाराज यांची प्रेरणा या उपक्रमामागे होती.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version