मे महिना हा रोटरी युवा सेवा महिना म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचा समावेश असलेल्या युवा महोत्सवाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प, रोटरी क्लब पनवेल इलाईट, रोटरी क्लब पुणे वारजे तर संयोजन रोटेक्स 3131 व रोट्रॅक्ट जिल्हा 3131 तर्फे करण्यात आले होते.
महोत्सवाची सुरवात विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांनी करण्यात आली. स्पर्धांमधील सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.
कोरोना काळात स्वतःला शारीरिक, मानसिक आणि आर्थिकरित्या सक्षम कसं ठेवावं याविषयी आयोजित चर्चासत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, समुपदेशक आनंद कुलकर्णी आणि बिझनेस गुरु राकेश जैन प्रखर यांनी मार्गदर्शन केले.
चर्चासत्राची सुरवात राष्ट्रगीताने करण्यात आली. रोटरी क्लबच्या पुणे जिल्ह्याच्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑक्सिजन नेक्स्ट या वृक्षदानाच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता करण्यात आली. पुणे जिल्ह्याच्या रोटरीच्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते रोटरीच्या विविध शाखेतील पदाधिकाऱ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.
यामधे रोटरी क्लब मगरपट्टा सिटीने, रोपांची तर रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीने वाहतूक व्यवस्था केली . प्रत्येक क्लबला १०० रोपे या प्रमाणे जवळपास पाच हजार रोपांचे वाटप आत्तापर्यंत करण्यात आले असून या रोपांचे रोटरीच्या विविध शाखांमार्फत शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
रोटरी जिल्हा 3131 युवाचे संचालक वसंतराव मालुंजकर आर. वाय. ई. संचालक अशोक भंडारी, एन.जी.एस. ई. संचालक नीरज मेहता, रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती च्या अध्यक्षा माया फाटक, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्पच्या अध्यक्षा अश्विनी शहा, रोटरी क्लब पनवेल इलाईट चे अध्यक्ष आशिष मेहता , रोटरी क्लब ऑफ पुणे वारजेचे अध्यक्ष विनायक पाटील, रोट्रॅक्ट जिल्हा 31 31 च्या जिल्हा रोट्रॅक्ट प्रतिनिधी श्रद्धा लामखडे, रोटॅक्स चे अध्यक्ष खुश संघवी इत्यादी या वेळी उपस्थित होते.

– लेखन : करुणा पाटील.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

खूपच छान