(काव्यबत्तीशी) वर्णसंख्या : ९/७/९/७
नववर्षाच्या स्वागताला
पुन्हा झालो तयार
झाले गेले ते विसरून
घेतले फक्त सार (१)
आव्हान पेलताना थोडा
कष्टाचा झाला भार
दुःखात उभे राहताना
त्रास पडला फार (२)
सुखाने दार ठोठावले
नवीन संधी दिल्या
यशाची चव चाखण्यास
हा आशिष मिळाला (३)
काहींचे घर उजाडले
सगळे हरवले
त्यात स्वतःला सावरले
जिद्दीने ते जगले (४)
नववर्षाच्या स्वागताला
पुनश्च सज्ज झाले
मनाच्या पतंगाचे दोर
पहा उंच उडाले (५)
उत्कर्षाचा नवा संकल्प
नवी मिळाली दिशा
आयुष्यात जोमाने असो
पुढे जाण्याची आशा (६)
नवी आव्हाने पेलण्याचा
केला आता निर्धार
विश्वास स्वतःवर ठेवा
हाच आहे आधार (७)

✍️रचना : तनुजा प्रधान, अमेरिका
कविता अभिवाचन : https://youtu.be/qQxKyl1pNzo
मस्तच