सरी धुंद सरता, पुन्हा ऊन आले;
जरा बोल थोडे, धराया अबोले
मनी साठलेले उरी दाटलेले,
उदासीन अश्रु डोळ्यात आले
कधी आसवांचे कधी आठवांचे,
सुक्या वाळवंटी झरे चिंब ओले
प्रत्येक भेटीत फुटतील लाटा,
चिरभाग्य वाळूवरी रेखलेले
पहा सर्व पक्षी विसाव्या निघाले,
क्षितिजास पखांवरी पेललेले
पुन्हा रात्रीचे स्वप्न गर्भार झाले,
अगणित अंधार नवसूर्य व्याले

– रचना : नयना_निगळ्ये. अमेरिका
सुंदर कविता