एक पुरग्रस्त पोरगा
देवाला विचारत होता
तू काही मागत नसता
तुला नैवेद्य मिळतो तुपाचा !१!
तोंड तुझं दिसत नाही
मग नैवेद्य कसा खाणार
मी चार दिवस उपाशी
मला खाऊ कोण घालणार ? !२!
तू देव नाहीस असे नाही म्हणणार
कशी वेळ आली आता बघ
उपाशी आहोत ना रे भावा
आईबाबासह तुझं उष्ट खातो देवा !३!
माणसांच्या बाजारात
आम्ही मात्र उपाशी
दयामाया उरली नाही
तू दाखवशील का जराशी !४!
निसर्गाच्या अवकृपेने
सारा गाव उद्ध्वस्त झाला
शेतीपिके खरडून गेली
शेतकरी राजा हताश झाला !५!
कसे होईल पुढे देवा
हाच प्रश्न झाला उभा
शासन देईल मदत
त्यात नको सवतासुभा !६!
बचेंगे तो और भी लढेंगे
हा विश्वास आमच्या मनात
शेतकरी सुखी तर जग सुखी
हा मंत्र गुंजतो कानात !७!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800