कवयित्री सौ पूर्णिमा आनंद शेंडे (कोल्हापूरे) लिखित, ‘ न्युज स्टोरी टुडे‘ प्रकाशित “पूर्णिमानंद” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्या, रविवारी, दि. १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता सिनेमन हाॅल, एमराल्ड क्लब, स्वस्तिक पार्क, चेंबूर, मुंबई येथे होणार आहे.
या प्रकाशनासाठी जेष्ठ कवी श्री सतीश सोळाकुंरकर, ‘के ई एम’ चे माजी अधिष्ठाता डाॅ अविनाश सुपे, त्यांच्या सुविद्य पत्नी डाॅ स्वाती सुपे, न्युज स्टोरी टुडे चे संपादक, निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, न्युज स्टोरी टुडे च्या निर्मात्या तथा प्रकाशक सौ अलका भुजबळ, ज्येष्ठ कवयित्री, गीतकार सौ सुरेखा गावंडे व काव्य रसिकांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे.
कवयित्री सौ पूर्णिमा आनंद शेंडे, एम टी एन एल मध्ये अधिकारी पदावर कार्यरत होत्या. वाचन व लिखाण या छंदामुळे त्यांच्या अनेक कविता, लेख अनेक वृत्तपत्रात, मासिकात प्रसिद्ध झाले आहेत.
“पौर्णिमानंद” हा त्यांचा पहिलाच काव्य संग्रह आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
अलका……खुप खुप धन्यवाद…पूर्णिमानंद काव्यसंग्रह
न्युज स्टोरी टुडे मार्फत प्रकाशन होत आहे.
याचा मला खुप आनंद होत आहे.
न्युज स्टोरी टुडेचे संपादक माननीय .देवेंद्र भूजबळ व
निर्मात्या प्रकाशक सौ अलका भुजबळ यांचे या
काव्यसंग्रहासाठी खुप मोठे योगदान आहे.
तुम्हा दोघांचे आभार व न्युज स्टोरी टुडे वेब पोर्टलला उत्तरोत्तर
प्रगतीसाठी शुभेच्छां.