Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यपैसा धन खोटे

पैसा धन खोटे

स्वार्थाचा करुनी त्याग,
साक्षरता धन व्हावे !
घडुनी शिक्षित पिढी,
सुखाचे गोडवे गावे !!

कष्टकरी जनतेला,
कष्टाचे मोल द्यावे !
राबणारे हात सारे,
सुखी हसरे दिसावे !!

ईमान ठेऊ मातीशी,
करुया मळे हिरवे !
बळीस सुख मिळण्या,
राहु शेतकऱ्या सवे !!

मातीचा मानव देह,
अंती मातीत वसावे !
जपुया शब्दांचे धन,
गोड शब्दच बोलावे !!

माय बाप भाऊ सारे,
बहिणीस प्रेम द्यावे !
माणुसकी नाते सारे,
मानव मना रुजावे !!

नको फुकटचा पैसा,
कष्ट सार्थकी लागावे !
राबत्या बळीराजाचे,
माय बाप तुम्ही व्हावे !!

पैशाची नसावी उर्मी,
धन दान धर्म द्यावे !
भुकेल्या देऊनी अन्न,
सुख वाटीत फिरावे !!

सुख कष्टाने मिळते,
कष्ट करीत राहावे !
स्वच्छ संकल्प घेऊनी,
कर्तृत्व सिद्धीस न्यावे !!

जी. पी. खैरनार.

– रचना : जी. पी. खैरनार. नाशिक

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. पैसा धन खोटे ..सुरेख कविता.
    जीपी एक बदल सुचवू का?
    पैशाची नसावी ऊर्मी च्या एवजी पैशाची नसावी गुर्मी…
    असे घेतले तर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं