Monday, September 15, 2025
Homeबातम्या"पैस प्रतिभेचा” प्रकाशित

“पैस प्रतिभेचा” प्रकाशित

आपण रोमांचित व्हावं असे अनेक अनुभव प्रतिभाताईंकडे आहेत. त्यांचे अनुभवसमृद्ध जीवन, पन्नास वर्षांचा विविधांगी लेखनप्रवास आणि त्यांचे लखलखीत विचारविश्व याचे समग्र आकलन करून देणारे महत्वाचे असे हे पुस्तक आहे, असे मत सुप्रसिद्ध अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी मांडले.

तर संस्कृत आणि वेदांच्या अभ्यासक डॉ. सुचेता परांजपे यांनी पुस्तकाचे वर्णन करताना म्हटले की, टीप कागदासारखे प्रतिभाताईंचे विचार टिपून घेत संवादात्मक शैलीतून ये हृदयीचे ते हृदयी पोहोचवणार्‍या मनमोकळ्या अशा या गप्पा आहेत.

प्रतिभाताईंच्या ललितसाहित्य इतकेच त्यांचे सामाजिक आणि राजकीय लेखनही प्रभावी असल्याने त्यांच्या विचारांशी आपली नाळ जुळली आणि त्यातूनच पुढे त्यांच्या मनाचा पैस जाणून घेता यावा म्हणून हे पुस्तक लिहिले असे लेखिका दीपाली दातार यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

उत्तरार्धात गीतांजली जोशी यांनी प्रतिभाताईंशी संवाद साधला, त्या संवादात प्रतिभाताईंनी अफगाणिस्तान मधील अनुभव, बादशाह खान यांची भेट, दुर्गाबाईंच्या आठवणी, आपल्या वडिलांनी राजकीय लेखन करताना आपल्याला दिलेला “Be Brave, but don’t get carried away by bravado” हा सल्ला, आपला लेखन प्रवास कसा सुरू झाला त्याच्या अनेक हृद्य आठवणी सांगितल्या.

डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे स्वतः कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध दडके यांनी केले.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा