Wednesday, July 2, 2025
Homeपर्यटनपोरबंदर : श्रीकृष्ण सखा सुदामा पुरी

पोरबंदर : श्रीकृष्ण सखा सुदामा पुरी

गुजरात राज्याचा जुनागड जिल्ह्यात पुण्यक्षेत्र श्री कृष्ण सखा सुदामाचे स्थान आहे. श्रीकृष्णाचा परममित्र सुदामा या गावी राहत होता, म्हणून या पुण्यक्षेत्राचे नाव त्याच्या नावाने पडले. हे क्षेत्र सुदामापुरी या नावाने ओळखले जाते.

जामनगर पासून हे क्षेत्र जवळ आहे. सोमनाथ द्वारकेच्या मध्यस्थानी असल्याकारणाने आम्ही पोरंबंदला जाण्याचा निर्णय घेतला. वेरावल व द्वारका यांच्या मध्यस्थानी सुदामापुरी हे स्थान आहे. सकाळी सातच्या सुमारास आम्ही सुदामापुरी कडे जाण्यास निघालो. वेरावल वरून गाडीत बसून साडे तीन तासात आम्ही सुदामा नगरीला पोहोचलो. सर्वप्रथम पोरबंदर चहा नाष्टा ग्रहण करून आम्ही मंदिराचे दर्शन करण्याकरिता गेलो.

या मंदिरा बद्दल मला आधीपासूनच रुची होती. हे मंदिर श्रीकृष्ण आणि त्यांचा भक्ता सुदामा यांना समर्पित आहे. हे मंदिर अत्यंत पुरातन आहे. महाभारताच्या वेळेचे आहे. मंदिराचे घुमट घुमटाकार आणि कोरीव काम केलेलं आहे. मंदिरात श्री कृष्णा, राधा सुदामा, सुमित्रदेवी याची मूर्ती आहे. या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तुळशी वृंदावन आहे “वृंदा”देवी म्हणजेच देवी सुमित्रा यांचे मुख्य स्थान आहे. देवीचे स्थान हे मंदिराच्या सुरुवातीला आहे. त्याचप्रमाणे येथे ८४ लाख योनी जन्म मृत्यू परिक्रमा आहे. मंदिराच्या परिसरात सुदामा श्रीकृष्ण भेट मिठी मारतानाची मूर्ती आहे. मंदिराचा पाठच्या बाजूस चामुंडा देवी, गणपतीचे मंदिर आहे.

सुदामा मंदिरात पोह्यांचे खूप महत्त्व आहे. येथे मुठभर पोह्यांचा प्रसाद दिला जातो. तो प्रसाद ग्रहण करून आम्ही मंदिराजवळ मंदिरे, आसपासची प्रेक्षणीय स्थळे भेट देण्यास निघालो. तेथे जवाहरलाल नेहरू तारंगण आकाशगृह थोड्याच अंतरावर आहे. आकाशातले ग्रह वास्तव्यात कसे दिसतात ते दाखवले जाते.

आम्ही मंदिराजवळ असलेले हनुमान मंदिर, जगन्नाथ पुरीचे प्रतिरूप असलेले मंदिरात गेलो. मंदिरात असलेली सुभद्रा बलराम व श्रीकृष्णाची मनमोहक मूर्ती, पाहून वाटले की जणू आपण जगन्नाथपुरीलाच आलो आहोत असेच भासते. सुभद्रा, बलराम आणि श्रीकृष्ण यांच्या बालपणाचा लीला येथे झाल्या. बालपणात श्रीकृष्णानं, असंख्य, असाधरण लीला केल्या. बालपणातच राक्षसांचा वध केला, ती कथा माझे वडील मंदिरात सांगत होते. ती स्तुती ऐकून आम्ही भारावून गेलो.

दर्शन घेऊन आम्ही संध्याकाळी पोर मंदिराजवळच्या बाजाराचा फेरफटका मारायला निघालो. सुदामा मंदिराजवळ पोरबंदरचे सुप्रसिद्ध आभूषण कंठभूषण, बांगड्या बाजूबंद, कमरपट्टा, पैंजण, कानातले चमचमते आभूषण अंधारात जणु लख्ख प्रकाश आकर्षणाचे प्रमुख केंद्र प्रमाण करीत होते. देवी मातेच्या अशा प्रकारचे आभूषण देवीची शान वाटते.

तेथून आम्ही गांधीजींचे जन्मस्थळ कीर्ती मंदिरात गेलो. कीर्ती मंदिरात गांधीजींच्या आठवणी आहे. जामवंत गुफा, त्यात महत्त्व म्हणजे तेथे सोनेरी रंगाची वाळू आहे. येथेच श्रीकृष्ण आणि जामवंत यांच्यात समंतकणी साठी लढाई झाली. जामवंत यांना जेव्हा श्रीकृष्णाच्या अवताराबद्दल कळले, तेव्हा त्यांची कन्या जामवंतीचे श्रीकृष्णाने स्थापित शिवलिंगच्या (रिचेश्वर महादेव मंदिर) साक्षीने लग्न केले. श्रीकृष्णाला पत्नीच्या स्वरूपात   जामवंती मिळाली

तेथून आम्ही नेहरू तारांगणच्या समोरच असलेल्या भारत मंदिरकडे गेलो. मंदिरात असंख्य साधुसंतांची मूर्ती, धर्मनिष्ठ, थोर पराक्रमी राजे महाराजे आहेत. राम, पार्वतीदेवी, महाराणा प्रताप, धन्वंतरी, नवनाथ, मीराबाई, गांधीजी, संत रामदास स्वामी, झाशीची राणी, सुभाष चंद्र बोस, गौतम बुद्ध, इस्सा, असंख्य महात्मे साधुसंत यांच्या मूर्ती खांब्यावर कोरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मूर्तीच्या वरील बाजूस त्यांच्या जीवन अनुभव लिखित केला आहे. आपल्या भावी जीवनात हा अनुभव आपल्याला महत्त्वाचा ठरेल म्हणून साधु, महात्मा यांनी ते आपल्यासाठी लिखित करून ठेवले आहे. महत्त्वाचे म्हणजे या भारत मंदिरात सर्वधर्माचे साधू संत महात्मे यांच्या मूर्ती आहेत. जाती-धर्म यापेक्षा उच्च विचारसरणी महत्वाची असते हे मला भासले.

भारत मंदिरात गेल्यावर आपल्या भारत देशावर आपल्याला गर्व होतो. आपल्या भारत देशात अनेक साधू संत, महात्मे जाहले. साधुसंतांच्या आशीर्वादानेच भारत मातेचे संरक्षण होते. म्हणून साधुसंतांना भिक्षा न देता दारातून जाऊ देऊ नये. हीच आपल्या देशाची संस्कृती आहे. ही संस्कृती अशीच पुढे चालत राहावी म्हणून भारत मंदिराला नक्की भेट द्या. भारत मंदिराला भेट देऊन मलाही वाटलं आपणही भारत देशासाठी काहीतरी करावं आणि आपली मूर्ती भारत मंदिरातच असावी. मंदिराला भेट दिल्यानंतर प्रत्येकाला हेच वाटते की प्रत्येक जन्मात आपला जन्म हा भारत देशातच होवो हीच मनापासूनची ईच्छा असेल.

– लेखन : वर्षा वासुदेव भावसार.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. मॅडम नवीन आर्टिकल मी तुमच्या आतुरतेने वाट बघतोय. मी तुमचा लेख आमच्या गावाच्या वर्तमान पेपरात वाचला.तुम्ही खूप छान लिहिता .तुमचे लेख खूप माहिती असते. मी तुमच्या लेख वाचूनच त्या जागेवर भेट द्यायला जातो.खूप मुळात माहिती देतात तुम्ही. मला तुमचे लेख खूप आवडत.मे तुमचा लेखाची आतुरतेने वाट पाहतो.

  2. तुमच्या आर्टिकल ची मी वाट पाहत असतो. तुमचा सगळी आर्टिकल मी वाचतो.

  3. वर्षा भावसार यांनी वज्रेश्वरी आणि सुदामा पुरी–पौरबंदरची माहिती,महत्व फोटो सहित थोडक्यांत, मुद्देसुद आणि साध्या सोप्या भाषेत, प्रभावीपणे दिली आहे.अशा प्राचीनतम, ऐतिहासिकद्रुष्ट्या महत्वपूर्ण व्यक्ती ,अवतार, घटना,प्रसंग यांच्या फोटोसहित माहिती मुळे आपली भावावस्था उत्तम होते आणि नकळत अशा माहिती मुळे आपल्या पुरातन, ऐतिहासिक वास्तू,वारंवार आपले मन तल्लीन होते. मा. देवेंद्र भुजबळ यांनी सुरू केलेल्या सोशल नेटवर्क मुळे वर्षा भावसार सारख्यांच प्रभावी लेखन कौशल्य समाजासमोर येईल.

  4. खूप छान लेख आहे आपला. असं वाचलं की नवीन माहिती तर मिळतेच परंतु जतन करून ठेवलेल्या आणि ठेवाव्या अश्या किती गोष्टी आपल्या देशात आहेत ह्याची नव्याने जाणीव होते. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील