Home बातम्या पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

0

महात्मा ज्योतीबा फूले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येते. त्याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

सदर प्रशिक्षण हे महाज्योतीमार्फत नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याकरिता असून हे प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे आहे.

सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह रु.6000/- इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश देखील देण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा.

उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेत स्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

अर्ज करण्याचा अंतीम दिनांक 25/01/2023 ही आहे. तरी महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करावा, असे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version