Home बातम्या श्रीवर्धन : नशामुक्ती जनजागृती अभियान

श्रीवर्धन : नशामुक्ती जनजागृती अभियान

0

महाराष्ट्र शासनाच्या सात आदर्श महाविद्यालयांपैकी एक, एस एन डी टी महिला विद्यापीठ संचालित महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय श्रीवर्धन, महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व श्रीवर्धन पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नशामुक्ती जनजागृती अभियान संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने झाली. महाराष्ट्र शासन नियोजित नशामुक्ती ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग घेण्यात आला. अमली पदार्थ व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली. श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या वतीने नशामुक्तीपर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत २२ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत कु. समृद्धी समीर पाटील, कु. साक्षी चंद्रकांत रामाणे, कु. सलोनी रुपेश शिरवटकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तर उत्तेजनार्थ कु. खदिजा अल्वारे आणि कु. शुभ्रा वाणी हिला सन्मानित करण्यात आले.

पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र गरड यांनी व्यसनाचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. पोलीस शिपाई कु. ज्ञानेश्वरी बामणेकर यांनी दामिनी पथकाविषयी माहिती दिली तर अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. डी. पी. राणे यांनी विद्यार्थिनींना व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याचे आवाहन करून मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी सहा. प्रा. सुमित चव्हाण यांनी केले.

या कार्यक्रमास सहा. प्रा. तृप्ती विचारे, सहा. प्रा. ऋषिकेश चोगले, सहा. प्रा. निखत शेख, श्रीम. मनीषा श्रीवर्धनकर, श्री. अभिजीत पुसाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version