जिद्द व कठोर परिश्रमास नव्या तंत्रज्ञानाची जोड दिल्यास या स्पर्धेच्या युगात सामान्य माणूस ही उल्लेखनीय काम करू शकतो, असा विश्वास निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर येथील दैनिक युवावार्ता कार्यालयात श्री देवेंद्र भुजबळ यांचा नुकताच संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
दुग्धविकास विभागाचे सेवानिवृत्त उपमुख्य दक्षता अधिकारी अशोक कुंदप, जेष्ठ पत्रकार सुधीर ब्रम्हे उपस्थित होते.
यावेळी साहित्य, संस्कृती मंडळाचे सदस्य, प्रा डॉ संतोष खेडलेकर यांनी प्रसार माध्यमांतील बदलत्या प्रवाहांचा वेध घेऊन सुंदर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी श्री देवेंद्र भुजबळ यांनी त्यांचे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले समाजभूषण पुस्तक डॉ संतोष खेडलेकर यांना भेट दिले.
दैनिक युवावार्ताचे संस्थापक संपादक श्री किसनभाऊ हासे यांनी मान्यवरांचे संगम व युवावार्ता दिवाळी अंक देऊन प्रास्ताविक केले. तसेच युवावार्ताच्या संघर्षशील वाटचालीचा सुरेख आढावा सादर केला.
साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री अरविंद गाडेकर यांनी स्वागत केले. तर सौ शैला वामन यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी दैनिक युवावार्ता परिवारातील सदस्यांसोबत
देवेंद्र भुजबळ यांनी दिलखुलास संवाद साधला.
दैनिक युवावार्ता कार्यालयातील सर्व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

– लेखन : संजय आहिरे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800