धर्मशास्त्र
सांगतसे
पाप पुण्य
दावतसे
वजाबाकी
आपसात
किती कसे
मोजतात
मानवात
दोन वृत्ती
सात्विकता
पाप कृती
राक्षसाची
वृत्ती दुष्ट
विचाराने
होती कृष्ट
पाप कर्म
वळतात
आळसात
जळतात
पाप फेड
सर्व काळ
सांगीतली
योनीकाळ
नर नारी
योग्य वागे
पाप पुण्य
पाठी मागे
देव करी
सदा न्याय
मिटवावा
तो अन्याय
हस्तक्षेप
देव कार्या
करू नका
मोह माया
सत्य योगी
घ्या दर्शन
मिटवावे
ते घर्षण
नकळत
होती चुका
भोग नको
जाई फूका
धर्मग्रंथ
वाचा जरा
हलकेच
मन करा
थोडी चुक
झाली तर
भगवंता
मनी स्मर
राम नाम
घेई मुखी
प्राणी होई
सदा सुखी
तोल करी
चित्रगुप्त
दुर्घटना
कधी मुक्त
कुणा तुच्छ
का म्हणावे
दिले सुख
ते मानावे
नको करू
अती हाव
सवे येती
वेड्या घाव
खाली हाती
येतो अन्
खाली हात
जातो पण्
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/07/IMG_20210722_172846-150x150.jpg)
– रचना : सौ शोभा कोठावदे