Wednesday, July 2, 2025
Homeबातम्याप्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करावे लागले - वर्षा ठाकूर घुगे

प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करावे लागले – वर्षा ठाकूर घुगे

मी मराठवाड्यातील पहिली महिला उपजिल्हाधिकारी आहे. मी प्रशासनात आले, त्यावेळी प्रशासन हे पूर्णपणे पुरुष प्रधान होते. मी पहिली महिला प्रांत, पहिली मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लातूर जिल्ह्याची पहिली महिला जिल्हाधिकारी असल्याने, प्रत्येक वेळी पहिलीच असल्याने केवळ व्यक्तिशः माझ्यासाठीच नाही तर प्रशासनात पुढे येणाऱ्या महिलांच्या दृष्टीनेही मला स्वतःला प्रत्येक ठिकाणी यशस्वी अधिकारी म्हणून सिध्द करावे लागले, असे मनोगत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी व्यक्त केले. त्या “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बोलत होत्या. विशेष म्हणजे त्या स्वतःही या पुस्तकातील एक कथा नायिका आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मनमोकळा संवाद साधताना प्रशासनात वेगवेगळ्या पदांवर काम करीत असतानाचे विविध आव्हानात्मक प्रसंग सांगून स्वतःवर असलेल्या विश्र्वासामुळे, वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि जनतेचे प्रेम यामुळे त्या त्या प्रसंगांवर कशी मात करता आली, विविध उपक्रम कसे यशस्वी करता आले आणि करता येत आहे हे सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, स्त्रीला यशस्वी होण्यासाठी तिच्या माहेर च्या आणि विवाहानंतर सासरच्या मंडळींचा पाठींबा असण्याची नितांत गरज जरी असली तरी प्रथमतः स्त्री ने स्वतःचे ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे.

या वेळी बोलताना प्रा गणेश घुगे यांनी आजचा विद्यार्थी हा पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वाढत असल्याने पालकांनी त्यांना समजून घेण्याची गरज प्रतिपादन केली. न्युज स्टोरी टुडे वेब पोर्टल हे अतिशय सकारात्मक काम करीत असल्याबद्दल त्यांनी पोर्टल चा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी प्रा डॉ अंकलीकर, डॉ अर्चना बजाज, शिवाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ उषाताई भोसले, ज्येष्ठ पत्रकार श्री जयप्रकाश दगडे आदींची समयोचीत भाषणे झाली.

प्रारंभी पुस्तकाचे लेखक, श्री देवेंद्र भुजबळ यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद करून एकच महिन्यात पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत वाचकांचे आभार मानले. तर प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांनी महिलांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन लिखाण केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकामुळे अनेक नवतरुणांना निश्चितच प्रेरणा मिळेल. लातूरसारख्या मराठवाड्यातील भागात या पुस्तकाचे प्रकाशन एका महिला अधिकाऱ्याच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या उपस्थित होणे म्हणजे निश्चितच उपस्थितांना एक पर्वणीच होती. छान कार्यक्रम…. तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन…!!!

  2. आम्ही अधिकारी झालो लेखक देवेंद्र भुजबळ सर या पुस्तकाची दुसरी आवृत्ती म्हणजे बेस्ट सेलर हे पुस्तक झाले.
    सौ वर्षा ताई ठाकूर घुगे तिघं वेळी प्रथम म्हणून मनापासून अभिनंदन
    सौ.अलका ताई भुजबळ यांचे विचार लिहीणाऱ्या महीलांनी पुढे यायला पाहिजे उतम मतं माडणी

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र ८७८८३३४८८२

  3. मराठवाड्यातील पहिली महिला
    उपजिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांचे अभिनंदन व उतुंग कार्यासाठी हार्दिक शुभेच्छां. मा. देवेंद्र भुजबळ यांच्या ‘आम्ही अधिकारी झालो’ या पुस्तकामुळे वर्षाताईंचा जीवनप्रवास त्यांचे कष्ट या पदाला पोहचणं हे ध्येय असल्याशिवाय शक्य नाही.
    खुप छान प्रेरणादायक लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४