मातृभक्ती, देशभक्ती,
खरीच काय असते ?
बदलला देश
गर्वाने म्हणू नका नुसते,
या पुढे जरा,
देशासाठी काही करा,
अनेक आव्हाने पेलण्यास
हवी तरुणाई,
भारत स्वतंत्र आहे,
बलवान नि खंबीर,
विकासाचा मंत्र आहे,
तंत्र शिका वीर,
उद्योग करा, सुरू करा,
उत्पादन काही, शोध लावा,
पेटंट मिळवा, चढाओढ पाही,
भारतास या महान
करण्यास तुम्ही सारे,
आजचा हा मंत्र आहे,
स्वदेशीचे वारे,
उत्तम निर्मितीतून
घडतील आश्चर्ये,
नारीशक्ती, युवाशक्ती,
भारत श्रेष्ठ होई,
सक्षम नेतृत्व आहे,
वेळ आहे योग्य,
चला पुढे व्हा सगळे,
बोलावते भाग्य,
नवनिर्मितीस वाव,
संधी ही सुरेख,
देशभक्ती कर्म करी,
नाव अमर राही… !!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800