मराठी भाषा विभागाच्यावतीने प्रबोधनकारांवर लघुपट तयार करण्यात येत असून तो पुढील एक दोन महिन्यात पूर्ण होईल. या निमित्ताने महाराष्ट्राला प्रबोधनकारांचे विचार समजतील, असे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री श्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी लिहिलेल्या ‘आठवणीतील प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघात नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री देसाई पुढे म्हणाले की, ‘प्रबोधन‘ नियतकालिकाचा शताब्दी वर्ष सोहळा नुकताच पार पडला. या निमित्ताने तीन खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. महाराष्ट्राला पुरोगामी ही ओळख ज्या काही समाजसुधारकांमुळे मिळाली त्यात प्रबोधनकारांचा समावेश आहे.
समाजातील वाईट प्रथा, रुढी, परंपरांना छेद देण्याचे काम त्यांनी केले. त्यातूनच आजचा समाज घडला. त्या सर्व कार्याची माहिती ‘आठवणीतील प्रबोधनकार‘ या पुस्तकातून मिळते. हा ठेवा महाराष्ट्राला कळण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करील, असेही श्री. देसाई म्हणाले.
याच कार्यक्रमात नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषेला, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून पत्रकार खंडुराज गायकवाड यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांना दहा हजार पाचशे पोस्टकार्डे पाठविण्यात आली, याबद्दल त्यांचा श्री देसाई यांच्या हस्ते ‘आठवणीतले प्रबोधनकार’ पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार भास्कर जाधव, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, पुस्तकाचे लेखक विजय वैद्य, मार्मिक चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, न्यूज१८ लोकमत चे संपादक महेश म्हात्रे, संघाचे विश्वस्त अजय वैद्य, कुटुंब रंगलंय काव्यात चे प्रा. विसुभाऊ बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
– टीम एनएसटी. 9869484800
प्रबोधनकार यांचे विचार जसे होते तसे परखड व सत्यवादी बाजू मांडणारे.. समाजापुढे आले तर समाजमनातील बरीच किल्मिश दूर होतील… आणि लोकांना वास्तव आणि अवडंबर यातील फरक समजायला लागेल. आज लोक वास्तवाला व वैज्ञानिक गोष्टीना फाटा देउन काल्कपनिक कथा, र्मकांडात आणि अवडंबर
यांनाच सत्य मानत आहेत…..
हे विचार लघुपट तसेच टी. व्ही. सिरीयल, शालेय अभ्यासक्रम त्यातुनही समाज मनावर स्थापीत करावा असे मला वाटते…