आपल्या अभिनय, दिग्दर्शनाबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ता म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार सर्वांना परिचित आहेत. सध्या संस्कार भारती च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ते नाटक विधेचे प्रमुख संयोजक म्हणून कार्यरत आहेत.
श्री प्रमोद पवार यांची नुकतीच संगीत नाटक अकादमी च्या नाटक विभागाच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
झुंज, टिळक आणि आगरकर पासून सुरू झालेल्या त्यांच्या नाट्य प्रवासात आर्य चाणक्य, रायगडाला जेव्हा जाग येते, फक्त लढ म्हणा, इथे ओशाळला मृत्यू, जाता नाही जात, अनन्या सारख्या लोकप्रिय नाटकातून भूमिका करून ते रसिकांमध्ये प्रिय झाले. गेली २० वर्षे संगीत नाटकांची निर्मिती व दिग्दर्शन यासाठी मुंबई मराठी साहित्य संघ, नेहरू सेंटर यांच्या तर्फे ते सातत्याने कार्यरत आहेत.
ही नियुक्ती म्हणचे श्री पवार यांच्या कार्याचा गौरव मानला जात असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
– टीम एनएसटी. 9869484800
खुप छान
धन्यवाद