लॉकडाऊन सैलावू लागल्यावर सर्वात आधी निर्बंध कशावरचे उठले, तर दारुच्या दुकानांवरचे. आपल्याकडे दारुबंदीचा प्रचार, प्रसार करणारे खाते असते व दारु दुकाने यांचे परवाने वितरीत करणारेही खाते असते व हे दोन्ही विभाग राज्य सरकारचे भाग असतात हा मोठा विरोधाभास असून याही विपरीत परिस्थितीत डॉ. अजित मगदूम व त्यांच्या सहकाऱ्यांनी दहा वर्षे हिकमतीने चालवलेले अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे काम हे प्रशंसनीय असल्याचे उद्गार सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आणि लेखक सुरेश हावरे यांनी काढले.
वाशीच्या साहित्य मंदिर येथे नुकत्याच झालेल्या अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या दशकपूर्ती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर डॉ डी.वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. प्रा. शिरीष पाटील, ज्ञानविकास संस्थेचे प्रमुख ॲड पी.सी.पाटील, गॅलॅवसीचे उपाध्यक्ष व सीएसआर हेड आदर्श नय्यर, रोटरीचे सुरेशबाबू हे मान्यवर उपस्थित होते.
देशात व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणावर वाढत असताना घरातील माताच आपल्या बालकांना चांगले वळण लावून व्यसनांपासून दूर ठेवू शकते असे सांगतानाच खरे तर अन्वयसारखी व्यसनमुक्तीची केंद्रे चालवावीच लागू नयेत अशी स्थिती देशात निर्माण व्हायला हवी असा आशावादही हावरे यांनी व्यक्त केला.
शरीराची, कुटुंबाची वाताहत करणाऱ्या व्यसनांना नाही म्हणा असे आवाहन करुन अन्वय व्यसनमुक्ती केंद्रासाठी काम करणाऱ्या समुपदेशकांचे कार्य मोठे असल्याचे यावेळी डॉ शिरीष पाटील आपल्या भाषणात म्हणाले.
सरकारची दारुबंदीसाठी इच्छाशक्तीच दिसत नाही असे चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्याचे उदाहरण देत प्रास्ताविकपर भाषणात अन्वयचे संचालक डॉ. अजित मगदूम यांनी खंत व्यक्त केली व याही विपरीत परिस्थितीवर मात करुन व्यसनमुक्तीचे कार्य होत राहो व बलसागर भारत होवो विश्वात शोभुनि राहो अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन डॉ मृण्मयी भजक हिने केले. संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिकांचे वितरण यावेळी करण्यात आले.
आय सी एल मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तिचा एकच प्याला हे सिद्धेश पवार दिग्दर्शित पथनाट्य याप्रसंगी सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी अन्वयच्या दहा वर्षाच्या वाटचालीत वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणाऱ्या कविता नायर, डॉ. अशोक पाटील, डॉ. सुरेखा पाटील, आपलं नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत, म.टा. चे पत्रकार मनोज जालनावाला, गझलकार प्रशंसनीय अन्वय ठाकूर , साहित्य मंदिरचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, लेखिका अरुंधती जोशी, टेक महिंद्राच्या श्रीमती वाधवा, चेतना फाऊंडेशनच्या कविता नायर आदिंचा सन्मान करण्यात आला.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
This is very nice coverage.
This program sends very important message for the youth.