तुला नेहमीच आवडलं
माझं बाहुली असणं
पण कळलं का रे कधी तुला
माझं सावली असणं ?
ओवाळून टाकलास जीव
मी टाकलेल्या कातीवर
होतास का माझाच
मी जागलेल्या रातीवर ?
निश्चिन्त विसावलास
माझ्या उघड्या छातीवर
कधी जाणलंस का जगणं
त्याखाली जाऊन वीतभर ?
किती सुंदर आहे ना
तुझं बरोबर असणं
काय हे वेड्यासारखं
मी प्रश्न विचारात बसणं !!
तुला आवडतं तशी आज
किती गोड हसतेय !!
छे आलाच बघ हा प्रश्न पुन्हा
की अजूनही फसतेय ?

– रचना : नयना निगळ्ये. अमेरिका
छान..!