Saturday, March 15, 2025
Homeबातम्याप्रसाद चिकित्सा : बांबू वस्तू प्रशिक्षण

प्रसाद चिकित्सा : बांबू वस्तू प्रशिक्षण

गुरुदेव सिद्धपीठ प्रेरित प्रसाद चिकित्सा, गणेशपुरी यांच्या पाठपुराव्याने आणि जिल्हा उद्योग केंद्र, पालघर पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या माध्यमातून बचत गटातील महिलांसाठी बांबू पासून तयार होणाऱ्या शोभिवंत वस्तूंची निर्मिती करण्याच्या प्रशिक्षणाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना प्रकल्प अधिकारी, एम सी ई डी पालघर, श्री. धम्मपाल थोरात म्हणाले कि, शासनामार्फत महिलांसाठी हे प्रशिक्षण मोफत असून, प्रत्येक प्रशिक्षणार्थी महिलेला शासनाचे प्रमाणपत्र व एक हजार रुपये मानधनसुद्धा मिळणार आहे. महिनाभर यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे ३५ % अनुदानासह बँक कर्ज प्रकरणासाठीही सहकार्य करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रसाद चिकित्साचे कार्यकारी व्यवस्थापक श्री. मिलिंद नरगुंद यांनी यावेळी बोलताना माहिती दिली की, एक महिना चालणाऱ्या या प्रशिक्षणाचे समन्वयन प्रसाद चिकित्साद्वारे होत असून भविष्यातही महिलांच्या आर्थिक विकासासाठी शासनाच्या सहाय्याने विविध प्रशिक्षणे घेण्याचे नियोजन आहे.

उपस्थित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यानीही प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी श्री. मगन जाधव (मुख्य प्रशिक्षक), सौ. पूनम गोफनर (सरपंच, मेढे वडघर ग्रामपंचायत), श्री. राजेंद्र पाटील (उपसरपंच, मेढे वडघर) श्री. वेखंडे (ग्रा.वि.अ., मेढे वडघर), श्री. शिवप्रसाद राऊत, पब्लिक रिलेशन व्यवस्थापक, कल्याणदिप तसेच प्रसाद चिकित्साचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रसाद चिकित्सा गेले ३० वर्षे तानसा खोऱ्यामध्ये शाश्वत विकासासाठी प्रयत्नरत आहे. महिलांची आर्थिक प्रगती होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमाने महिलांना बचतीची सवय लावून स्थानिक संसाधनांच्या आधारे उपजीविकेचे पर्याय त्यांना उपलब्ध करून देते आहे. तानसा खोरे हे नैसर्गिक संसाधनांनी युक्त असून विविध जंगली वनस्पतींनी समृद्ध आहे. बांबू हा या आदिवासी संस्कृतीचा कणा आहे. त्यामुळे त्याच्यावर आधारित उपजीविकेचा पर्याय हा शाश्वत होऊ शकतो.

मुंबईसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने बांबूच्या गृह उपयोगी वस्तूंसह शोभेच्या वस्तूंनाही मागणी आहे. यामुळेच बांबू उत्पादन प्रशिक्षण हा शाश्वत विकासासाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात प्रसाद चिकित्साने केंद्र पुरस्कृत अटल बांबू समृद्धी योजनेच्या अभिसरणातून इथल्या महिलांना बाल्कोवा, न्युटन, टूलडा अशा उत्तम प्रजातींच्या बांबूच्या उती संवर्धित रोपांचे वाटप केले आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments