Home Uncategorized आम्ही सिद्ध लेखिका : ठाणे, पुणे वृत्तांत

आम्ही सिद्ध लेखिका : ठाणे, पुणे वृत्तांत

1

महिला लेखिका, कवयित्रीनी पाच वर्षांपूर्वी सुरू केलेली साहित्यिक संस्था म्हणुन “आम्ही सिद्ध लेखिका” ही संस्था आता चांगलीच नावारूपाला आली आहे. वाचू या, या संस्थेच्या ठाणे आणि पुणे शाखेचे वृत्तांत.
— संपादक

ठाणे: “आम्ही सिद्ध लेखिका” संस्थेची वार्षिक सभा आणि पहिली पंचवार्षिक निवडणूक ऍड. उमा धापटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. नयना सहस्त्रबुद्धे या़ंच्या अध्यक्षतेखाली आणि मा. वासंती वर्तक यांच्या सहकार्याने नुकतीच पार पडली.

या निवडणूकीसाठी संस्थेच्या महाराष्ट्रातील सर्व आजीवन सदस्य तसेच विश्वस्त, सल्लागार, माजी कार्यकारणी पदाधिकारी, विभाग प्रमुख, जिल्हा शाखा प्रमुख उपस्थित होते.सचिव वृषाली राजे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात पार पडली.

नवनिर्वाचित पदाधिकारी:
अध्यक्ष. प्रा. पद्मा हुशिंग
उपाध्यक्ष. मा. शुभांगी गान
सचिव.. प्रा. मानसी जोशी
कार्याध्यक्ष.. मा. यामिनी पाठक
खजिनदार..मा. प्रतिभा चांदूरकर
सहखजिनदार.. अस्मिता चौधरी
सहसचिव.. प्रा. स्नेहल पाठक
सहसचिव.. सुनेत्रा जोशी

आणि इतर 9 कार्यकारणी सदस्य अशी 17 जणांची समिती बिनविरोध निवडून आली.

ठाणे शाखा: नवीन कार्यकारिणी

संस्थेचे विश्वस्त, सल्लागारही मागील कार्यकालाप्रमाणे पुढील पाच वर्षासाठी कार्यकारणीकडून नियुक्त केल्या गेले.

वार्षिक सभेचे अध्यक्षस्थान मा. नयना सहस्त्रबुद्धे यांनी स्वीकारले होते. सल्लागार मा. वासंती वर्तक आणि मा. नयना सहस्त्रबुद्धे या़ंचे हस्ते नवीन कार्यकारणीचे अभिनंदन करून नियुक्तीपत्र देण्यात आले. माजी सचिव वृषाली राजे यांची सर्वानुमते सल्लागार पदी निवड करण्यात आली..

पुणे : आम्ही सिद्ध लेखिका, पुणे विभागातर्फे ‘गुरुपौर्णिमेचा’ उत्सव नुकताच अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.

संस्थेच्या अध्यक्षा मा. प्रा. पद्माताई हुशिंग, पुणे विभाग प्रमुख मा. चारुशीला बिवरे आणि मराठवाडा विभाग प्रमुख मा. स्नेहल पाठक या प्रमुख पाहुणे म्हणून तसेच पुणे कार्यकारिणी सदस्य आदरणीय गायत्रीताई हेर्लेकर, खजिनदार अर्चना अंबासकर आणि कार्यवाह सौ. वर्षा फाटक उपस्थित होत्या.

पुणे कार्यक्रम:उपस्थिती.

कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर माननीय अर्चनाताई पंडित यांनी सुस्वरात ईशस्तवन व गुरुमहिमेची महती सांगणारी गाणी गायली.

चारुशीला बिवरे यांनी प्रास्ताविक सादर केले. नंतर आदरणीय सुमनताई बहिरट यांच्या किर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम अतिशय भावपूर्ण आणि भक्तिरसपूर्ण होता. किर्तनात सर्वजण रंगून गेले.

यानंतर सरिता आठवले यांनी त्यांच्या मधुर आवाजात गाणी गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.

किर्तन आणि गाणी या दोन्हीसाठी श्रीपाद कुलकर्णी – पेटी आणि गजानन जोशी – तबला यांनी उत्तम प्रकारे साथ दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मलाताई विंचू यांनी अत्यंत उत्तम रितीने पार पाडले. आभारप्रदर्शन शिल्पाताई फणसे यांनी केले. कार्यक्रम ठरलेल्या वेळात संपन्न झाला. या सुंदर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. श्रोत्यांकडून या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. खूपच सुंदर कार्यक्रम ते ही गुरुपौर्णिमा चा शुभ दिवस साधून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version