मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या
सहयोगी प्राध्यापिका डॉ यशोधरा वराळे, यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२३” या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात व समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या कृतार्थ भावनेने आपल्या अतुलनीय व अद्वितीय अशा कर्तुत्वाने आदर्शाचे नवे मापदंड त्या निर्माण करीत आहेत. मानवतेच्या उद्धारासाठी व शाश्वत विकासाच्या दृष्टीने त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्याग, सेवा , सामाजिक न्याय व अपेक्षित परिवर्तनासाठी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक ८ जुलै २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. दिपक केसरकर, सामाजिक विभाग आयुक्त, मा. प्रशांत नारनवरे, विश्र्वस्त ॲडव्होकेट श्री. संघराज रूपवते, श्री. संजीव बौधनकर, संस्थेचे सचिव, श्री. आशिष गाडे, संस्थेचे कार्यकारी सदस्य आदींची उपस्थिती तसेच इतर मान्यवर व शिक्षक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ही उपस्थिती होती.
या पुरस्काराबद्दल डॉ. यशोधरा वराळे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
Dr. Yashodhara Varale Madam
Associate professor and I/C principal Dr. Ambedkar Law College Wadala, Mumbai-31.Hearty Congratulations for the felicitated and awarded you are a “Andrash Shishak Puraskar 2023” by the hands of our Hon’ble Chairman Peopel’s Education Society’s shri. Anandraj Ambedkar Saheb.