Thursday, February 12, 2026
Homeसाहित्यप्रिय वसुंधरेस

प्रिय वसुंधरेस

तप्त झालीस वसुंधरे तू
कोप तुझा साहवेना
कोणत्या झाल्या चुका की
काही केल्या शांतवे ना

काहीली का एव्हढी ती
कायाच अवघी तापली
कुणी काय केले संतापण्याला
धग पेटती ती राहिली

छायेत जगतो आम्ही तुझ्या
उद्विग्न का तू जाहली
रुष्ट तो वरुण राज ही
का व्यथा ना जाणली

तप्त झालीस तू अशीकी
शांतवाया येई तो
तव अंगणी शिंपूनी पाणी
आल्हाद देऊनी जाई तो

याच वेळी काय झाले
भेट का दुरावली
वणवाच होऊनी अंतरी तू
साऱ्या जगावर कोपली !!

सुनंदा पानसे

– रचना : सुनंदा पानसे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खुप सुंदर कविता 👌👌👌.धन्यवाद 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11