नात्याने जाऊ असलेल्या, पण प्रत्यक्षात माझी प्रिय सखी असलेल्या सौ अलकाताई भुजबळ यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने माझी ही शब्द सुमनांजली💐
बाळ पाठीशी घेऊन केली
हिमालयाची उत्तुंग भरारी ।
धैर्य घेऊनी झाली पादाक्रांत ।
नोकरी करुनी संसार सांभाळला ।
दिले स्वावलंबनाचे धडे ।
सुस्वभावी सखी ग बनली सर्वांची ग तू ।
आदर्श माता ममता दिधली देवश्री ला ।
लडिवाळ पणे सांभाळ केला मातेसम रेशमी नात्यांचा।
हास्यमुद्रा गाली प्रसन्न अलकादेवी ।
सवंगड्यांसह छंद ही जोपासले l
टीव्ही मालिका बंदिनी, दामिनी मधून पोहचली घराघरांत ।
उत्साहाचे अमृत पाजले तव मातेने l
पिता कुमार मामांची कन्या तू l
सार्थ केले सासर माहेर ।
अभिमान वाटतो आम्हा सखींना ।
सुखीसंसारावर संकट आले ।
हद्दपार केलेस तू कर्करोगाला l
प्रबळ इच्छाशक्तीने खचली नाही l
मनाने तू खंबीर देवी अलका तू ।
कॉमाद्वारे कॅन्सर वर देऊन तू व्याख्याने l
मने केली भक्कम सखींचे आधार झालीस तू ।
सहनशक्तीचा अंत ग तुझा वेदना झाल्या अपार ।
पती देवेंद्र, लेक देवश्री झाले चिंतातूर ।
पण पुण्यवान तू, आशिष घेऊनी चिंता केली दूर । साक्षात देवीच तू औक्षवंत हो ।
सदैव सुखीसंसार होऊ दे l
करते सुरेखा प्रार्थना हीच ईश्वरचरणी 🌹🙏

– सौ सुरेखा रासने. संगमनेर
Alka तुझ्यासाठी समर्पक असेच हे लिखाण आहे.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कवयित्री सुरेखा ताईंनी दिला खूप छान
काव्यमय पुष्पगुच्छ सौ.अलकाताईंना
अलकाताईंचं कर्त्रुत्व वाचून आनंद ह्रुदयी मावेना
अभिनंदनासह वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
प्रेमपूर्वक सौ.अलकाताईंना
न्यूज स्टोरी टुडे मार्फत करतायत
अलका ताई छान सेवा माय मराठीची
सेवानिवृत्त होऊनही उभारली गुढी
देवेंद्रजींच्या जोडीने राष्ट्रीय कार्याची
दुर्धर आजारावर मात करत
दिलं तोंड संकटांवर हिमतीने
शेकडो वाचकांना दिली सकारात्मक ऊर्जा
सुंदर पुस्तकातून अलका ताईंच्या लेखणीने
उत्तम आरोग्यासह लाभो अलका ताईंना
आनंदाचं सुखाचं दीर्घायुष्य
प्रभूकृपेने उज्वल होवो त्यांच्यासह
सर्व कुटुंबियांचं भविष्य
Happy Birthday sau.Alka Tai
राजेंद्र वाणी
दहिसर मुंबई 🙏🌹
शतशः आभार
🌹सौ. अलकाताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
अशोक बी साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
शतशः आभार
खूप सुंदर शब्दरचना… कधी पाहिले नाही अलकाताईना. पण डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. खूप खूप शुभेच्छा अलकाताई. तुमच्या पुढील दीर्घायुरारोग्यासाठी…
शतशः आभार