जगात आईवर हजारो कविता आहेत. त्यात काही वावगे नाही.
पण सासुवर मात्र कधीच कविता दिसत नाही.
पण आपल्या पोर्टलच्या कवयत्री सौ सुरेखा रासने यांनी त्यांच्या सासूआई 13 मे द्वादशीला सहा महिने पूर्ण झाल्याच्या स्मृतीस जागून पुढे “शब्द पुष्पांजली”
अर्पण केली आहे.
लासुर संगमनेर सासर माहेर पार करुनी, शिवनामाई आली प्रवरा तिरी।
भोळा सांब पती सोमनाथ कष्ट सोसले अपार त्यांनी, वैभव मिळाले तुजला फार ।
साथ दिली ग खंबीर तू लाभले ऐश्वर्य थोर।। कष्ट सोसले अपार तू वंश बहरला ।
पोटी जन्माला गोरक्ष हिरा
मंगलवाद्ये वाजवते नंदा झाले बंधुराज ।
भगिनी समान नणंदा तुझ्या ग सुशीला इंदूशांता ग ।
स्नेहाने जपती तुजला अति काळजीने
भोजन बनवून तृप्त केले तू l
सासु सासर्यांची लाडली तू आशिष देती तुजला। शकुंतले संदिप तू लावला।
पूर्व जन्माचे संचित तुझे सेवेस उभे l
अंजली, गौरव, उत्कर्ष।
पुजा करुनी गीता गाते सुपर्ण आरोही । प्रणाम करते स्नुषा सुरेखा तुजला आशीष मागुनी ।
गोपाळ, किशोर भाचे दत्ता, श्रीकांत, विलास, मानती तू पुण्य काशीसमान।
अतिथी देवो भव धर्म शिकवला। नतमस्तक होतो तुझ्या ग चरणी। वाट पाहत मृत्यूची क्षणात गेली दूरवर।
मृत्यूवर तू विजय मिळवला पुष्पवृष्टी करिती सांबसदाशिव, पंकज ।
वंदन करून आशिष मागतो ग माऊली तूच आमची सावली l
– रचना : सौ सुरेखा रासने. संगमनेर

सासूआई यांच्यावरील उत्तम कविता.