गुलाबी थंडीच्या गारव्यात
साथ देते उबदार मिठी तुझी
चांदण्यांच्या पावलांनी
बिलगते होऊन अर्धांगिनी तुझी
तुझ्या अलवार स्पर्शाने
धुंदी चढली माझ्या मनात
रम्य भासले जीवन सारे
कोरले नाव तुझे ह्रदयात
तुझ्या प्रेमाच्या झऱ्यामधून
ओंजळीत प्रीत तुझी भरले
स्वप्नांच्या दुनियेत जगताना
गुलाबी गाली हास्य उमटले
पाहुनी समोर तुला सख्या
आज ही अशी मी बावरली
प्रेमऋतू बहरणार आजही

✍🏻 परवीन कौसर, बेंगलोर