तू प्रेमाची केली होतीस द्रुतगती गोलंदाजी
फिरकी माझी मंदगती तू मारून गेलीस बाजी
चौकार षटकारांची होती तुझीच आतिषबाजी
शून्यावर अडखळलो तरीही खेळण्यास मी राजी
तू साद घालता धाव काढण्या सुसाट धावलो मी
क्षण एकावरून वाचलो अन भरून पावलो मी
प्रेमामध्ये भासलीस जणू तू गोलंदाज मलिंगा
तुझा न कळला एक ही चेंडू मी घालत होतो पिंगा
खेळविले मज प्रेमाचे तू विविध चेंडू टाकून
तुझ्याच गुगलीत फसलो सारे चेंडू बाकी राखून
मला न कळले तुझ्यासमोर मी कसा खेळलो होतो
बॅटिंगचा माझा नंबर कितवा हेच विसरलो होतो.

– रचना : अजय बिरारी
कविता सादरीकरण बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
अजय सर...अप्रतीम रचना …डी