(वृत्त~नववधू)
मी तुला पाहता बावरले
मम चित्त कसे हे थरथरले ॥धृ॥
झंझावातासम तो आला
कधी कसा तो नाही कळला
मनी माझिया कायम वसला
मम ह्रदय कसे हे धडधडले ॥१॥
मी तुला पाहता….
ओढ अशी मज काय लागली
नजर तुझ्यावरची ना ढळली
भाव तुझ्या नजरेत बोलके
कलिकेला या सहज उमजले ॥२॥
मी तुला पाहता…
वाटे मजसी करी धरावे
मधुर भाषणे पुलकित व्हावे
नजरेचा तव वेध घेतसे
देहभान माझेच हरपले ॥३॥
मी तुला पाहता…
तळमळ जीवा तव भेटीची
आस एक मज सहवासाची
नकोत वाटे अशी बंधने
धावत तुजपाशी रे आले ॥४॥
मी तुला पाहता बावरले
मम चित्त कसे हे थरथरले॥

— रचना : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

अरुणाताई, खूप सुंदर भावगीत रचना केली आहेत. तुमचे हार्दिक अभिनंदन 🙏💐
अरुणाताई खूप छान गीत रचना.
अरुणा खूप सुंदर गीत लिहिले आहेस. भावोत्कट रचना. कुणाला तरी चाल लावायला दिली पाहिजे.
खूप सुंदर