गंगाखेड येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्यावतीने नुकतीच ‘मुंशी प्रेमचंद’ जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्रेमचंद यांच्या साहित्यावर बोलतांना संगमनेर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रा.डॉ. सचिन कदम म्हणाले की, प्रेमचंद यांनी ‘कृषि आणि शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्या विवंचनेवर आपली लेखनी प्रखरतेने चालवली. प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ कादंबरीचा शेतकरी नायक ‘होरी’ कर्जाच्या विवंचनेतून आत्महत्या करतो. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीची ही समस्या आजही कायम आहे. किंबहुना या समस्येने आज उग्र रूप रूप धारण केले आहे. रोज कुठे ना कुठे महाराष्ट्रात आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करतो आहे. ‘पूस की रात’ ही कथा देखिल याच आशयाची आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.धूत व मान्यवरांनी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केली. डॉ.सचिन कदम यांचा सत्कार करण्यात आला.

प्रो.डॉ.एम.डी.इंगोले यांनी प्रास्ताविक व सूत्र संचालन केले. प्रा.डॉ.भेंडेकर यांनी आभार मानले. सहकारी प्रा.डॉ.एम.आर. हाके, प्रा.सुहास देशमाने यांनी संयोजन केले.
या प्रसंगी प्रो.डॉ.दयानंद उजलंबे, प्रो.डॉ.कीर्तिकुमार मोरे, प्रो.डॉ.संजय कदम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरक्षा रक्षक बालाजी जवादे यांनी विशेष परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800