Home लेख प्रेम म्हणजे प्रेम असतं…

प्रेम म्हणजे प्रेम असतं…

4

प्रेम म्हणा, प्यार म्हणा, लव म्हणा ही आपल्याला मिळणारी अनुभुती असते. जेव्हा आपल्याला सर्वांकडून ते मिळू लागते याचाच अर्थ आपल्या अंतरंगातील आत्मा प्रसन्न असतो.

प्रेम हा आनंदाचा पाया आहे. प्रेम हे माणसाचे स्वरूप आहे. प्रेमात आनंदाने असणे ही त्याची स्थिती असते.
प्रेमाने स्फुरत राहणे हा त्याचा स्वभाव असतो.
जो आनंद मिळतो त्या आनंदाने व्यवहार करत राहणे हा धर्म होय.

I am ❤️
You are❤️
We are ❤️
All is ❤️
म्हणजेच जिंदगी प्यार का गीत आहे. प्रेम ही भावना सुंदर आहे. जसे वारकरऱ्याचे पांडुरंगावर प्रेम, शिष्याचे गुरूवर प्रेम, राधेचे कृष्णावर प्रेम, आईचे मुलावरील प्रेम. ज्याला प्रेम कळले त्याला देव कळला असे म्हणतात.

बाकी सर्व शून्य असते.सगळ्या मुक्या सृष्टीवर हि प्रेम करता आले पाहिजे. प्रेमाने कोणाकडून काम करून घेतल्यास १००% रिझल्ट मिळू शकतात. ते अगदी नवरा बायकोच्या रिलेशनशिप पासून ते आपल्या हाताखाली काम करणाऱ्यापर्यत. जर सतत दुसऱ्याचा अपमान, द्वेष केला तर प्रचंड निगेटिव्ह लहरी आपल्या कडे येतात. बऱ्याच लोकांना डेथ बेडवर गेल्यावर प्रेमाची आठवण होते !

किती गमावले किती उरले हि वेळ कुणावरच येऊ नये. भावनाशून्य होण्याचे कारण म्हणजे पैसा. ह्यात सजा आपल्याला आणि दुसरऱ्याला हि मिळते.

प्रेम आतून असतेच पण भौतिक विश्वात रममाण झालोय कि कोणासाठी मुखात हि येत नाही. निसर्गात जरी गेलो तरी मुके जीव सुद्धा प्रेम करताना दिसतात.
प्रेमाची गाणी ऐकली ना तरी जागृती येईल. प्रेम करायला शिकलो तर द्यायला हि येते. हे विश्व हि प्रेम द्यायला लागते.

जिंदगी प्यार का गीत है
जिसे हर दिल को गाना पडेगा
जिंदगी गम का सागर भी है
जिसको हसके उस पार जाना पडेगा.
❤️❤️❤️❤️

शलाका कुलकर्णी

– लेखन : शलाका कुळकर्णी. नेदरलॅंड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

4 COMMENTS

  1. लाली मेरे लाल की,
    जिथ् देखूं तिथ् लाल,

    लाली देखनें गयी मैं,
    मैं भी हो गयी लाली लाल…

    प्रेम म्हणजे प्रेम असत….
    खूप लेखन विचार
    श्रीमती शलाका मॅडम खूप खूप धन्यवाद

  2. वाह, छान लेख आहे…!
    आपल्या गुरुकृपा संस्थेच्या ‘हिम्मत का तराना ‘कार्यक्रमामध्ये हे गाणं आम्ही आवर्जून वापरत असतो … प्रशांत थोरात,पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version