असेना का मी,
लिंबू टिंबु लिखाणात
पण त्यानं का साहित्य प्रेम जोखल जातं ?
मन सदैव टिपत असतं,
सुबक सुंदर शब्द
ज्यानं दुसऱ्याच मन लगेच वाचलं जातं
तेच शब्द देत असतात,
जगण्याला उभारी
उत्तम ते ऐकण्याची कानाचीही असते तयारी
कामात असतानाही,
त्यांचाच असतो आधार
हे प्रेम मात्र कधी घेतलं नाहीय उधार
न्यूज स्टोरी नी दिली,
विचारांना चालना
अलका तू म्हटलस की लिहावच लागत ना ?
कोण कधी येईल आयुष्यात,
सांगता येत नसतं
प्रेरणा देणारं हे कुणीतरी मनात जाऊन बसतं !

– रचना : सुनंदा पानसे. पुणे
खरंय सुनंदा, लिहायला कोणाचीतरी प्रेरणा लागते. मग आपोआपच शब्द मनांत सुचायला सुरूवात होते. मलाहि भुजबळ दांपत्यांमुळेच प्रेरणा मिळते. 🙏🙏🙏 त्यांचे मनापासून आभार आहेत. असच खुप लिखाण तुझ्या लेखणीतून झरझर उतरू दे.
वाह मस्त
🌹अतिशय सुंदर कविता 🌹
खरंच शब्दच देत असतात जगण्याची उभारी
🌹
कोण कधी येईल आयुष्यात,
अप्रतिम रचना 🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अतिशय सुंदर साध्या सोप्या भाषेत सहज लिहिलेली कविता खूप उर्जा देणारी 👌👌👍👍🌹🌹